Pune News : पुण्यात झालेल्या वार्तालप कार्यक्रमातून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यवरून भाजपवर थेट हल्ला केला आहे. हिंदुत्वाची व्याख्या आणि राजकीय मैत्री यावरून त्यांनी भाजपला कोंडीत पकडले आहे. भाजपने एनडीएच्या घटक पक्षांशी केलेल्या युतीवर बोट ठेवत, जेव्हा आम्ही भाजपसोबत होतो, त्यावेळी कडवट हिंदुत्ववादी होतो. भाजपला सोडले म्हणजे हिंदुत्व सोडले का? असा आक्रमक सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
पुण्यातील वार्तालप कार्यक्रमातून बोलताना त्यांनी अनेक प्रश्नांना उत्तरे दिली आहेत. आम्ही काँग्रेससोबत गेलो म्हणून हिंदुत्व सोडले म्हणता. मग नितीश कुमार हिंदुत्ववादी आहेत का? चंद्राबाबू हिंदुत्ववादी आहेत का? भाजपचे मुस्लिम सौगात ए मोदी वाटत आहेत, ३२ लाख लोकांना सौगात ए मोदी वाटतात. तरीही ते हिंदुत्ववादी. म्हणजे याचा अर्थ असा की भाजप जे करेल ते अमर प्रेम आणि इतरांनी केले तर लव्ह जिहाद, असे कसं होऊ शकते? अशी टीका उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली आहे.
त्यासोबतच यावेळी एका प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले, 'राजकारणात अनेकजण शिवसेनेत (Shivsena) तयार झाले आहेत. पुढचे तुम्हाला काही सांगायची गरज नाही. तुम्ही ठाकरे ब्रँडचा उल्लेख केला. तो काही आताच जन्माला आला नाही. तो चार पाच पिढ्यांचा आहे. ज्यांनी नावारुपाला आणला तो आजोबा आणि माझ्या वडिलांनी. त्या ठाकरे ब्रँडचा जन्म पुण्यात झाला ,असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
त्यामुळे तुमचं आणि आमचं जुनं नातं आहे. पुण्याला वेगळी परंपरा आहे. विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं की जात होतं. आता मुंबई काय आणि पुणे काय सर्व माहेर घरे बिल्डरांची झाली असल्याचा आरोप त्यांनी केला.
शिवाजी पार्कवरील झालेला अभूतपूर्व दसरा मेळावा झाला आहे. शिवाजी पार्कात तळे झाले होते. त्याही चिखलात शिवसैनिक होता. वयोवृद्ध आले होते. स्वतची चटणी भाकरी घेऊन आले होते. आपल्याकडे बिर्याणीची सोय नाही. पाऊस पडत असतानाही सर्व आले होते. तिथे काही दरवाजे नाही. त्यामुळे आलेल्यांना कोंडून ठेवण्याची गरज वाटली नाही. इतरांना वाटली असेल, भाषणे सुरू झाल्यावर दरवाजे बंद करतात, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.