Manoj Jarange Patil and Suresh Dhas On Beed Murder Case Sarkarnama
पुणे

Beed Santosh Deshmukh Case : जरांगेना बेड्या ठोका, धसांचा राजीनामा घ्या; ओबीसी नेते आक्रमक

Manoj Jarange Patil and Suresh Dhas : संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर मराठा समाज आणि अनेक नेते संतापले असून आक्रोश मोर्चे निघत आहेत. तर परभणीतील मोर्चात मनोज जरांगे पाटील आणि सुरेश धस यांनी कठोर शब्द वापरले होते. यानंतर आता नवा वाद सुरू झाला आहे.

Sudesh Mitkar

Pune News : बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून राज्यातील राजकारण तापलं आहे. या प्रकरणाला आता जातीय स्वरूप येऊ लागलं असून राजकीय नेत्यांकडून आरोप प्रत्यारोपांची राळ उडवताना पाहायला मिळत आहे.

पण आता मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील आणि भाजप नेते आमदार सुरेश धस यांच्या विरोधात ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. त्यांनी जरांगेना बेड्या ठोका, धसांचा राजीनामा घेण्याची मागणी केली आहे. याबाबत सोमवारी (ता.६) पुण्यात पत्रकार परिषद झाली.

संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कडक शासन व्हावे आणि देशमुख कुटुंबाला न्याय मिळावा, या मागणीसाठी राज्यभर मोर्चे काढण्यात येत आहेत. या मोर्चादरम्यान मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील आणि भाजप नेते आमदार सुरेश धस यांनी ओबीसीतील वंजारी समाजाला लक्ष केले. समाजावर वक्तव्य केली होती. या वक्तव्यावरून आता नवा वाद सुरू झाला आहे.

या वक्तव्यावरून मनोज जरांगे पाटील आणि भाजप नेते आमदार सुरेश धस यांच्यावर ओबीसी आंदोलक मंगेश ससाणे टीका केली आहे. यावेळी ससाणे म्हणाले, ओबीसी समाजाचा घटक असलेल्या वंजारी समाजाला आरोपीच्या पिंजऱ्यात बसवण्यात येत आहे. ज्या पद्धतीने एखाद्या समाजाविरोधात चितावणीखोर भाषा करण्यात येत आहे. त्यांच्या घरात घुसण्याची भाषा करण्यात येत आहे. त्या विरोधात राज्याच्या गृह खात्याने तात्काळ पावलं उचलून जातीय सलोखा राखावा.

मनोज जरांगे पाटील जातीयवादी असून त्यांनी काही चिथावणी खोर वक्तव्य केली आहेत. यामुळे त्यांना आळा घालावा. त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. त्यांच्यावर याआधीदेखील चार ते पाच गुन्हे दाखल असून आंतरवली सराटी येथे जो काही पोलिसांवर हल्ला झाला याचे खरे मुख्य सूत्रधार मनोज जरांगे आहेत, असा दावा ससाणे यांनी केला आहे.

मनोज जरांगे यांचे गुन्हे पाहता त्यांना बेड्या घालाव्यात. मनोज जरांगे यांच्याबरोबरच भाजप आमदार सुरेश धस देखील जातीयवादी विष पेरत असल्याचा आरोप ससाणे यांनी केला आहे. धस यांच्या वक्तव्यांमुळे दोन समाजात तेढ निर्माण होत असून त्यांचा गृहमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा, अशीही मागणी ससाणे यांनी केला आहे.

तसेच सुरेश धस यांनी वक्फ बोर्डाची आणि मंदिरांची जमीन लाटली आहे. बँकांचे त्यांनी कर्ज बुडवली आहेत. या सर्व प्रकरणाची चौकशी करून महाराष्ट्रातील जातीय सलोखा टिकवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पावलं उचलावीत, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असून निवेदन देणार असल्याचेही ओबीसी आंदोलक मंगेश ससाणे यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT