OBC Pune Rally News  Sarkarnama
पुणे

OBC Pune Rally News : ओबीसींवर अन्याय खपवून घेतला जाणार नाही ः माळी महासंघाने ठणकावलं!

Maratha Reservation Vs OBC Reservation : ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देण्यास विरोध...

Chaitanya Machale

Pune News : मागील काही महिन्यांपासून संपूर्ण राज्यात मराठा समाज आरक्षणाचा विषय जोरदार पेटला आहे. ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी मागणी करीत मनोज जरांगे-पाटील यांनी आंदोलन सुरू केले आहे, तर मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत विरोध नाही, मात्र हे आरक्षण ओबीसी प्रवर्गातून दिले जाऊ नये, अशी ठाम भूमिका ओबीसीनेते आणि सरकारमधील छगन भुजबळ यांनी घेतली आहे. (Latest Marathi News)

आरक्षणाच्या मुद्द्यावरून या दोन्ही नेत्यांमध्ये गेले काही दिवसांपासून जोरदार शाब्दिक युद्ध सुरू आहे. हे दोन्ही नेते एकमेकांवर टीकेची झोड उठवत आपली आपली भूमिका मांडत आहेत. त्यातच मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक असून ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही, असेच आरक्षण दिले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. नुकत्याच नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये विधानसभेच्या सभागृहात याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी सरकारच्या वतीने निवेदन करीत आपली भूमिका मांडली आहे. मात्र त्यानंतरदेखील मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका मराठा समाजाचे नेते जरांगे-पाटील यांनी घेतली आहे.

मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी आरक्षण कमी करू नये. तसेच ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देण्यास विरोध करण्यासाठी माळी महासंघाच्या वतीने अभिवादन रॅली काढण्यात आली. दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरासमोरील भिडेवाडा ते गंज पेठेतील महात्मा फुलेवाडा (समता भूमी) अशी ही रॅली निघाली. रॅलीचे जागोजागी स्वागत करून ओबीसी समाजाला पाठिंबा देण्यात आला.

माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अरुणभाऊ तिखे, माजी आमदार कमल ढोले-पाटील, संघटनेचे पुणे शहराध्यक्ष दीपक जगताप, आमदार रवींद्र धंगेकर, माजी महापौर वैशाली बनकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वसंत मोरे यांच्यासह अन्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. ओबीसीचे आरक्षण कमी करून तसेच ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही. राज्य सरकारने चुकीचा निर्णय घेत तो लादण्याचा प्रयत्न केल्यास राज्यकर्त्यांना धडा शिकविल्याशिवाय गप्प बसायचे नाही, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT