Pune Loksabha: पुढील वर्षी लोकसभा निवडणुका होत आहेत. ही निवडणूक भाजपप्रणित एनडीए, तर विरोधकांच्या इंडिया आघाडीसाठी महत्त्वाची असणार आहे. याचमुळे ही निवडणूक प्रचंड चुरशीची असणार आहे.
या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. आता 2019 ला लोकसभा निवडणूक न लढवलेली मनसे आगामी निवडणूक लढविणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी मनसे आगामी निवडणुकांना स्वबळावर सामोरे जाणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. कल्याण, ठाणे, पुणे, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर यासह एकूण ९ लोकसभा मतदारसंघांत मनसेकडून चाचपणी सुरू आहे.
याचवेळी मनसेकडून सोशल मीडियावर लोकसभेच्या संभाव्य उमेदवारांची नावांची यादी शेअर करण्यात आली आहे. यात पुणे, मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, दक्षिण मुंबई, कल्याण, ठाणे, संभाजीनगर, सोलापूर, रायगड अशा 9 लोकसभा मतदारसंघांवर मनसे कामाला लागली असल्याचे समोर येत आहे.
पुण्यात वसंत मोरे(Vasant More) यांचे नाव जाहीर केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. मोरे यांच्या समर्थकांनी अगोदरच राजकीय वातावरण तापवताना थेट त्यांची भावी खासदार म्हणून जोरदार बॅनरबाजी केली आहे. मोरे यांनी २०१९ची विधानसभा निवडणूक लढवली. त्यांना ३४ हजार ८०९ इतके मतं मिळाली होती. मोरेंच्या या झंजावाताचा फटका भाजपचे उमेदवार योगेश टिळेकर यांना बसला होता. त्यांचा २ हजार ८२० मतांनी पराभव झाला होता. वसंत मोरे यांच्या उमेदवारीमुळे भाजपसह आघाडीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पक्षबांधणी, बैठका, मेळावे, दौरे यांनी जोर दिला आहे. याच धर्तीवर त्यांनी मनसे(MNS) नेत्यांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच सर्व नेत्यांना लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्याची जबाबदारी देण्यात आली होती. आता थेट संभाव्य उमेदवारांची नावेच जाहीर करत त्यांनी आघाडी प्रचारात आघाडी घेतली आहे.
मनसेचे संभाव्य उमेदवार-
कल्याण लोकसभा - राजू पाटील
ठाणे लोकसभा - अभिजित पानसे/ श्री अविनाश जाधव
पुणे लोकसभा - वसंतराव मोरे
उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा- शालिनीताई ठाकरे
दक्षिण मुंबई लोकसभा- बाळा नांदगावकर
संभाजीनगर लोकसभा - प्रकाश महाजन
सोलापूर लोकसभा - दिलीप धोत्रे
चंद्रपूर लोकसभा - राजू उंबरकर
रायगड लोकसभा - वैभव खेडेकर
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.