Ajit Pawar
Ajit Pawar Sarkarnama
पुणे

AJit Pawar : सत्तासंघर्षावर अजित पवार म्हणतात; यांनी कितीही आव आणू द्या...

सरकारनामा ब्यूरो

पुणे : राज्यातले सरकार अजून स्थिरस्थावर नाही. न्यायालय अजूनही तारखावर तारखा देत आहे. अंतीम निर्णय काय होणार याची नेमकी कल्पना कुणालाच नाही. त्यामुळे सरकारने कितीही आव आणला तरी या सरकारवर अजनूही टांगती तलवार कायम आहे, असे मत विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज व्यक्त केले.

पुण्यात बोलताना त्यांनी राज्य सरकार आणि बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत भाजपाकडून सुरू असलेली तयारी व वक्तव्यांवर टीका केली. ते म्हणाले, ‘‘ राज्य सरकारकडून रोज नव्या घोषणा केल्या जात आहेत. मात्र, या सरकारचेच अजून काही खरे नाही. न्यायालयाची सुनावणी लांबली आहे. न्यायालयात नेमका काय निर्णय होणार हे कुणीच सांगू शकत नाही. त्यामुळे या सरकारमध्ये बसलेल्यांनी कितीही आव आणला तरी यांच्यावर टांगती तलवार कायम आहे.

’’न्यायालयात अंतीम निकाल शिवसेनेच्या बाजूने होईल, असे तज्ञ सांगत आहेत. यावर न्यायालयात सुनावणी सुरू आहे. लवकरात लवकर निर्णय होईल, मात्र, निर्णय न्यायालय देणार असल्याने त्यावर आताच बोलून उपयोग नसल्याचे विरोधी पक्षनेते पवार यांनी सांगितले.

भारतीय जनता पार्टीचे सरकार राज्यात आणि केंद्रात सत्तेत आहे. हे लोक महागाईवर बोलण्याऐवजी इतर अनावश्‍यक गोष्टींवर बोलून लक्ष विचलित करत आहेत.शेतकऱ्यांना मदत करण्यापेक्षा जातीय आणि धार्मिक विषयावर बोलत आहेत, अशी टीका पवार यांनी केली. लोकांचे प्रश्न‍ सोडविण्यापेक्षा प्रत्येक गोष्टीत राजकारण केले जात आहे, असे पवार यांनी सांगितले.

ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर केल्या त्याप्रमाणे इतर जिल्हा परिषदा व महाापलिकांच्या निवडणुका घ्यायला हरकत नाही, असे मत पवार यांनी व्यक्त केले. मुंबई महापालिका निवडणुका राष्ट्रवादीने शिवसेनेबरोबर लढाव्यात या मताचा मी आहे. याबाबत कॉंग्रेसचा निर्णय कॉंग्रेस घेईल, असे त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT