इंदापूर (पुणे) : पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या निवासस्थानी गणेश उत्सवानिमित्त राज्याचे माजी सामाजिक व न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी भेट दिली. यावेळी मुंडे यांनी शिंदे-फडणवीस (Shinde government) सरकारवर टीका केली.
गणेशोत्सवा निमित्त राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील, राज्याचे माजी बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, व आता धनंजय मुंडे यांनी गारटकर यांच्या गणपतीचे दर्शन घेतले आहे. यामुळे आता गारटकर यांचा गणपती कोणाला पावणार याची चर्चा शहरात होत आहे.
"राज्यातील नव्याने स्थापन झालेले सरकार हे दळभद्री सरकार आहे. या सरकारच्या लोकप्रियतेवर लोकसभेला 45 प्लस चे स्वप्न पाहणे हे स्वप्नच राहून ते धुळीस मिळाल्या शिवाय राहणार नाही," अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली.
मुंडे म्हणाले, "भाजपच्या येणाऱ्या पिढीने चोवीसशे वर्ष जरी जन्म घेतला तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या पुणे, बारामती, पिंपरी चिंचवड या भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला काही फरक पडणार नाही. भाजपची अशी पॉलिसी आहे. की आपल्या बाबतीत इतर ठिकाणी जेव्हा वातावरण खराब होते. त्या वेळेस अशा ठिकाणी जायचे की त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची चर्चा होईल. केवळ ही चर्चा होणे यासाठीच त्यांचे बारामतीला येणे जाणे आहे. कारण या अगोदर अनेक निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने त्याच बारामती मध्ये स्वतःचे डिपॉझिट गमावले आहे,"
"भारतीय जनता पार्टीचे टार्गेट हे 45 प्लस की 48 प्लस अथवा 300 प्लस एकट्या महाराष्ट्रातून निवडून येतात की काय याचे उत्तर मी देऊ शकत नाही. ज्यांनी टार्गेट ठेवले आहे तेच देऊ शकतात. टारगेट काय ठेवावे हा त्यांचा अधिकार आहे. परंतु जनतेने कोणाला मनामध्ये टार्गेट केला आहे. हे सर्वांना माहिती आहे," असेही मुंडे म्हणाले. यावेळी प्रदीप गारटकर, सचिन बोगावत, सुरेश बिबे, सागर पवार आदी उपस्थित होते.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.