Omraje Nimbalkar Sarkarnama
पुणे

Omraje Nimbalkar : ऑपरेशन टायगर'मध्ये ओमराजेंची सस्पेन्स एन्ट्री; 20 जूनपर्यंत 'वेट अँड वॉच'चा फॉर्म्युला!

Omraje Nimbalkar Political Strategy : महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगरमुळे नवा ट्विस्ट आला आहे. ओमराजेंच्या सस्पेन्स एन्ट्रीमुळे चर्चांना उधाण आले असून 20 जूनपर्यंत त्यांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतल्याची चर्चा आहे.

Sudesh Mitkar

Pune News : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या 'ऑपरेशन टायगर'ने प्रचंड खळबळ उडवून दिली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या पक्ष फुटी वरून प्रचंड टीका होताना पाहायला मिळत आहे.

या प्रकरणांमध्ये सर्वाधिक जास्त टीका ही ओमराजे निंबाळकर यांच्यावरती होताना दिसत आहे. अशातच धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मात्र या संपूर्ण 'घडामोडीत तूर्तास 'वेट अँड वॉच'ची म्हणजेच कोंडीत टाकणारी भूमिका घेतली असल्याचं सांगितलं जात आहे.

ठाकरे गटाच्या खासदारांमध्ये पडलेल्या फुटीच्या आणि संभाव्य पक्षप्रवेशाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत ठाकरेंच्या शिवसेनेकडून पक्षाची एक तातडीची आणि महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. मात्र, या बैठकीला ओमराजे निंबाळकर गैरहजर राहण्याची दाट शक्यता आहे.

सध्या ते पुण्यातील आपल्या निवासस्थानी कुटुंबीयांसमवेत तळ ठोकून आहेत. आगामी 20 जून रोजी लागणाऱ्या न्यायालयीन निकालानंतरच ते आपली पुढील अधिकृत राजकीय दिशा स्पष्ट करणार असल्याचे सांगितले जात आहे. तोपर्यंत कोणताही घाईगडबडीत किंवा दबावाखाली निर्णय न घेण्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे.

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत बंडखोर खासदारांचा गट सामील होणार की काय, अशा चर्चांनी दिल्ली ते मुंबई वातावरण तापलेलं असतानाच ओमराजेंनी घेतलेल्या या सावध पवित्र्यामुळे राजकीय वर्तुळातील सस्पेन्स आणखी वाढला आहे.

20 जून रोजी कोर्टाचा नेमका काय निकाल लागतो, यावरच ओमराजेंचा पुढचा निर्णय अवलंबून असेल, असं बोललं जात आहे. त्यांनी स्वतःहून 20 तारखेनंतरच प्रसारमाध्यमांसमोर येऊन आपली भूमिका मांडणार असल्याचं कळवल्यामुळे, 'ऑपरेशन टायगर'च्या या गडबडीत ओमराजे निंबाळकर नेमकी काय भूमिका घेतात आणि 20 जूननंतर महाराष्ट्राच्या राजकारणात कोणती नवीन समीकरणं उदयास येतात, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT