Kaustubh Ganbote's Wife On Pahalgam Attack, Sharad Pawar Sarkarnama
पुणे

Pahalgam Terrorist Attack : "टिकल्या फेकल्या, अल्लाह हू अकबर म्हणालो तराही..."; गणबोटे यांच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला दहशतवादी हल्ल्याचा थरार

Kaustubh Ganbote's Wife On Pahalgam Terrorist Attack : "दहशतवादी हल्ला झाल्यानंतर त्या ठिकाणी आम्हाला बऱ्याच लोकांनी मदत केली. सैन्य दलाचीही खूप मदत झाली. मात्र त्या मदतीला उशीर झाला होता. तोपर्यंत माझे पती आम्हाला सोडून गेले होते. माझ्या पतींना माझ्या डोळ्यासमोर गोळ्या घातल्या. त्यातले दहशतवादी तुम्ही अजाण वाचा म्हणून सांगत होते."

Sudesh Mitkar

Pune News, 24 Apr : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये पुण्यातील कौस्तुभ गणबोटे आणि त्यांचे मित्र संतोष जगदाळे यांची दहशतवाद्यांनी निर्घृण हत्या केली. या हत्येमुळे पुणेकरांवर शोककळा पसरली आहे. अशातच गुरूवारी (ता.24) पहाटे या दोघांचे पार्थिव पुण्यात आणण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी गणबोटे आणि जगदाळे कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केलं. यावेळी कौस्तुभ गणबोटे यांच्या पत्नीने शरद पवारांसमोर दहशतवादी हल्ला झाला त्यावेळीचा अंगावर काटा आणणारा अनुभव सांगितला.

त्या म्हणल्या, "दहशतवादी हल्ला झाल्यानंतर त्या ठिकाणी आम्हाला बऱ्याच लोकांनी मदत केली. सैन्य दलाचीही खूप मदत झाली. मात्र त्या मदतीला उशीर झाला होता. तोपर्यंत माझे पती आम्हाला सोडून गेले होते. माझ्या पतींना माझ्या डोळ्यासमोर गोळ्या घातल्या.

त्यातले दहशतवादी तुम्ही अजान वाचा म्हणून सांगत होते. त्या दहशतवाद्यांचं ऐकून आम्ही तिथं असलेल्या सगळ्या महिलांनी मोठ मोठ्याने अजान म्हंटल पण तरी देखील दहशतवाद्यांचं समाधान झालं नाही त्यांनी आमच्या माणसांना मारून टाकलं.

जेव्हा दहशतवादी हल्ला झाला तेव्हा तिथे गेटवर एक मुस्लिम व्यक्ती उभा होता. तो त्या दहशतवाद्यांना म्हणत होता तुम्ही कशाला निरपराध लोकांना मारताय त्यांनी काय चुकी केली आहे? मात्र त्या दहशतवाद्यांनी कोणतीही तमा न बाळगता त्याला सुद्धा गोळ्या घातल्या.

त्यांचा मित्र बाजूला होते त्यांना त्या दहशतवाद्यांनी बोलावून घेतलं आणि म्हणाला 'अजान पढता है क्या, पढता है क्या कुछ?' त्यांचं बोलण ऐकून आम्ही आमच्या टिकल्या काढून फेकल्या आणि आम्ही सगळे 'अल्लाह हू अकबर' म्हणायला लागलो.

तरीदेखील त्या दहशतवाद्यांनी माझ्या पतीला सोडलं नाही, असा भयानक अनुभव त्यांनी यावेळी सांगितला. हे सर्व सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले होते. दरम्यान, यावेळी त्यांनी घोडेवाल्यांनी आपणाला कशी मदत केली हे देखील सांगितलं.

त्या म्हणाल्या, "आम्ही तिथं घोड्यावर बसून गेलो होतो. या प्रसंगानंतर आम्हाला भीती वाटत होती. आम्ही पळत सुटलो तिथून तर चिखलात गुडघ्या इतके पाय खाली रुतत होते. आमच्या घोडेवाला मुस्लिम होता पण ते खूप चांगले होते ते आम्हाला हल्ला झाल्यानंतर घ्यायला आले. त्यांनी आमची खूप मदत केली."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT