Pune News, 27 Apr : जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या आतंकवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांना 48 तासांमध्ये देश सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, अद्यापही काही पाकिस्तानी नागरिक देशातच असल्याचं समोर आलं आहे.
तसंच काही पाकिस्तानी नागरिक गायब असल्याच्या बातम्या देखील समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला आहे. पुण्यामध्ये माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस म्हणाले, पुणे महापालिकेला 75 वर्षे पूर्ण झाली आहेत.
तसंच पुणे महापालिकेचे पहिले प्रशासक बर्वे यांच्या 111 व्या जयंतीचे औचित्य साधून पुणे अर्बन डायलॉग हा अतिशय उत्तम मंच या ठिकाणी उपलब्ध झाला आहे. या मंचावर आज विविध क्षेत्रातील तज्ञ चार विषयांवर ती बोलणार आहेत. ज्यामध्ये अर्बन प्लॅनिंग, अर्बन गव्हर्नन्स, डिझास्टर मॅनेजमेंट आणि अर्बन मोबिलिटी अशा विविध विषयांवर चर्चा होणार असून या चर्चेच्या माध्यमातून यासारख्या समस्यांवर एक पॉलिसी तयार करण्याचा प्रयत्न आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन झालं असून या ठिकाणी मी सरकारची याबाबत काय भूमिका असेल याबाबत सांगितलं आहे. शहरांमध्ये अतिक्रमण आणि फ्लेक्सबाजी वाढली आहे यावर कंट्रोल आणणे आवश्यक आहे. मी देखील सर्व महापालिकांना सूचना दिली आहे की, माझे जरी फ्लेक्स कार्यकर्त्यांनी अनधिकृतपणे लावले तर ते ठेवू नका काढून टाका.
कुठेतरी याबाबत कडक धोरण आपल्याला करावे लागेल. कारण आपली शहर यामुळे विद्रूप होत आहेत, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. दरम्यान, यावेळी त्यांनी पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्याच्या मुद्द्यावर बोलताना एकही पाकिस्तानी गायब नसल्याचं स्पष्ट केलं. ते म्हणाले, "मी गृहमंत्री म्हणून तुम्हाला सांगतो कृपया यावर उलट्या सुलट्या बातम्या करू नका.
काही माध्यमं सांगत आहेत की 107 पाकिस्तानी नागरिक हरवले आहेत. मात्र, कुणीही हरवलेलं नाही. जेवढे पाकिस्तानी नागरिक आहेत ते सर्व सापडले आहेत. सगळे बाहेर चाललेले आहेत. सगळ्यांची घालवण्याची व्यवस्था केली आहे. एकही पाकिस्तानी नागरिक इथे राहणार नाही. आज सायंकाळपर्यंत अथवा उद्यापर्यंत ही कारवाई पूर्ण होईल," असं फडणवीस यांनी सांगितलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.