Pankaja Munde-Supriya Sule
Pankaja Munde-Supriya Sule  Sarkarnama
पुणे

Supriya Sule To Pankaja : पंकजांच्या मदतीला धावल्या सुप्रिया सुळे; म्हणाल्या, ‘गोपीनाथ मुंडे हयात नाहीत; म्हणून त्यांच्या लेकीशी...’

संतोष आटोळे

Pune News : गोपीनाथ मुंडे आज हयात नाहीत; म्हणून त्यांच्या लेकीशी तुम्ही कसेही वागाल का?, हा अन्याय आहे. कोणतंही राजकारण न करता राज्यातील आणि देशातील कुठल्याही लेकीवर अन्याय होत असेल तर मी तिच्या बाजूने खंबीरपणे उभी राहील. भाजपचे लोक एकीकडे 'बेटी बचाव आणि बेटी पढाव' म्हणतात. मग पंकजा मुंडे भारतीय जनता पक्षाची लेक नाहीत का? असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपला केला. (Pankaja Munde is not BJP's daughter? : question by Supriya Sule)

खासदार सुप्रिया सुळे या इंदापूर दौऱ्यावर होत्या. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी पंकजा मुंडे यांच्या कारखान्यावर जीएसटी विभागाकडून करण्यात आलेल्या कारवाईवरून सुळे यांनी भाजपवर निशाणा साधला. सुप्रिया सुळे यांनी सोमवारी रात्री उशिरापर्यंत इंदापूर शहरातील गणेश मंडळांना भेटी देत गणरायांचे दर्शन घेतले.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, पंकजा मुंडे यांचे वडील गोपीनाथ मुंडे यांनी हयात असताना जेवढं भारतीय जनता पक्षासाठी केले. तेवढे करणारे महाराष्ट्रात नेते कमी असतील. भारतीय जनता पक्ष सत्तेत असण्यासाठी केवढे कष्ट केले. आज त्यांची मुलगी लढतेय. त्या आज ज्या भारतीय जनता पक्षात आहेत, तो पक्ष त्यांच्यावर अन्याय करण्याचं पाप करत आहे, याचा मी जाहीर निषेध करते.

भाजपच्या एका खासदाराचे घर अडचणीत सापडले होते. एका बॅंकेने त्यांच्या घराचा लिलाव काढला होता. मात्र, त्यावेळी भारतीय जनता पक्ष किंवा अदृश्य हाताने त्यांच्या घराचा लिलाव कसा थांबवला. भाजपचे लोक एकीकडे ‘बेटी बचाव आणि बेटी पढाव’ असे सांगतात. मग, पंकजा मुंडे भारतीय जनता पक्षाची लेक नाहीत का, असा सवाल सुळे यांनी भाजपला केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT