Eknath Pawar Sarkarnama
पुणे

Eknath Pawar Resigns : भाजपला झटका; जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी माजी शहराध्यक्षांचा राजीनामा

Pimpri Chinchwad : नितीन गडकरी यांचे अत्यंत जवळचे सहकारी आहेत.

Mangesh Mahale

Pimpri : भारतीय जनता पक्षाचे माजी शहराध्यक्ष, पिंपरी चिंचवड महापालिकेतील माजी सत्तारूढ पक्षनेते आणि सध्याचे प्रवक्ते एकनाथ पवार यांनी रविवारी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील भारतीय जनता पक्षाला मोठा फटका बसलेला आहे. मराठा समाजासाठी जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केले. त्यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी सगळ्या पदाचा राजीनामा देत आहे , अशी भूमिका पवार यांनी जाहीर केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पिंपरी चिंचवडच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद वाढवण्यामध्ये एकनाथ पवार यांचे योगदान मोठे आहे. टाटा मोटर्स मधील कामगार नेते म्हणून त्यांनी कामगार चळवळीत योगदान दिले. पिंपरी-चिंचवड शहरामध्ये भारतीय जनता पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न केले शहराध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र प्रमुख, पक्षप्रवक्ते अशी विविध पदे भूषविली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे अत्यंत जवळचे सहकारी आहेत.

२०१२ मध्ये भाजपा शहराध्यक्ष म्हणून काम केले. त्याचबरोबर २०१४ च्या भोसरी विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली होती. त्यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी यांनी पिंपरीमध्ये सभा घेतली होती. मात्र भाजपा, शिवसेना, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष अशी लढत झाल्याने अगदी थोडक्या मतांनी त्यांचा पराभव झाला होता.

स्थानिक नेत्यांच्या राजकारणात फटका!

भोसरी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये थोडक्या मतांनी त्यांचा पराभव झाला होता त्यानंतर २०१७च्या महापालिका निवडणूकमध्ये पूर्णनगर, संभाजी नगर प्रभागातून निवडून आले होते. त्यानंतर तीन वर्षे पक्षाचे महापालिकेचे सत्तारूढ पक्षनेते म्हणून त्यांनी भूमिका बजावली. मात्र, स्थायी समिती सभापती म्हणून त्यांना डावलले गेले. आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप यांच्यातील स्थानिक राजकारणाचा फटका एकनाथ पवार यांना बसला, असे असतानाही त्यांनी आपल्या प्रभागामध्ये नव्हे तर, शहर परिसरामध्ये पक्षनेता म्हणून काम करत असताना मोठ्या प्रमाणावर विकास कामे केली.

म्हणून पक्षाला रामराम!

भारतीय जनता पक्षातील निष्ठावान आणि ज्येष्ठ सहकाऱ्यांमधील ज्येष्ठ नेते म्हणून एकनाथ पवार यांचं योगदान आहे. भाजपातील अंतर्गत गटबाजीचा फटका त्यांना बसला. भोसरी विधानसभेमध्ये विद्यमान आमदार महेश लांडगे असल्याने आगामी काळात संधी नसल्याने गेल्या काही वर्षांपासून ते नांदेड मधील लोहा कंधार विधानसभा मतदारसंघामधून संघटना बांधण्याचे काम करत होते. त्या मतदारसंघांमध्ये शिवसेनेची अर्थात उद्धव ठाकरे यांना मानणारे मतदार मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे एकनाथ पवार यांनी शिवसेनेबरोबर जाण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

सगळ्या पदाचा राजीनामा

"गेले ३० वर्ष भाजपा पक्षात कार्यकर्ता म्हणून काम केले. कारसेवक, नगरसेवक, पक्षनेता म्हणून काम केले. नितिन गडकरी, गोपीनाथ मुंडे, देवेंद्र फडणवीस, भाऊसाहेब फुंडकर यांच्यामुळे मला संधी मिळाली. भाजपामुळे सामान्य कार्यकर्त्यास काम करण्याची संधी मिळाली. मराठा समाजासाठी जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केले. त्यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी सगळ्या पदाचा राजीनामा देत आहे,"

- एकनाथ पवार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT