Former Minister Calls BJP 'Thieves, Not Dacoits' Sarkarnama
पुणे

Pimpri-Chinchwad BJP: पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप लागली कामाला, निवडणुकीच्याआधी जम्बो कार्यकारणी जाहीर!

Pimpri-Chinchwad BJP Shatrughan Kate Mahesh Landge : पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा भाजप कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. तब्बल 300 जणांची मुलाखत घेतल्यानंतर ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.

Roshan More

Pimpri-Chinchwad Politics: पिंपरी-चिंचवड महापालिकेची प्रभाग रचना जाहीर झाली आहे. त्यामुळे निवडणुकीचे बिगूल लवकरच वाजेल अशी शक्यता आहे. मात्र, भाजपची कार्यकारिणी कधी जाहीर होणार याची प्रतिक्षा भाजप कार्यकर्त्यांना होती अखेर गणरायाच्या आगमनाच्या दिवशी बुधवारी (ता.27) भाजपचे पिंपरी-चिंचवडचे अध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी जम्बो कार्यकारणी जाहीर केली.

चार सरचिटणीस, सात उपाध्यक्ष, एक वरिष्ठ उपाध्यक्ष असलेल्या या कार्यकारिणीत आठ सचिव आहेत. कार्यकारिणीत तब्बल 126 जणांना स्थान देण्यात आले आहेत. यामध्ये विविध आघाड्यांच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.

भाजपच्या कार्यकारिणीमध्ये सरचिटणीस (संगठन) मोरेश्वर शेडगे, तर, सरचिटणीसपदी विकास डोळस, मधुकर बहिरू बच्चे, वैशाली खाडये यांना स्थान मिळाले आहेत तर, वरिष्ठ उपाध्यक्षपदी काळुराम बारणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सचिवपदी नवनाथ ढवळे, राजेंद्र बाबार, खंडूदेव कठारे, दीपक भोंडवे, युवराज लांडे, मंगेश कुलकर्णी, गिरीश देशमुख, अभिजित बोरसे, यांना संधी देण्यात आली आहे.

तब्बल 300 जणांच्या मुलाखती

कार्यकारिणी जाहीर करताना शत्रुघ्न काटे यांनी सांगितले की, जिल्हा कार्यकारीणी गठीत करीत असताना पक्षातील सर्व घटकातील प्रत्येक कार्यकर्त्यांना न्याय मिळावा अशी माझी प्रामाणिक इच्छा होती त्यामुळेच पक्ष कार्यालयात तीनशे पेक्षा अधिक कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेतल्या व प्रसंगी प्रमुख सर्व स्थानिक नेत्यांच्या भेटी घेतल्या आणि त्यानंतरच प्रत्येक कार्यकर्त्याची क्षमता व पक्षासाठी दिलेले योगदान लक्षात घेऊनच विचारपूर्वक कार्यकारीणी बनविण्यात आली आहे.

समतोल साधण्याचा प्रयत्न

पिंपरी-चिंचवडमध्ये भोर मतदारसंघाचे नेतृत्व महेश लांडगे करतात तर, चिंचवड मतदारसंघाचे नेतृत्व शंकर जगताप करतात. शहराचा विचार करता समतोल कार्यकारिणी निवडण्याचे आवाहन होते. सर्व समाजघटकांना स्थान देत लांडगे आणि जगताप यांच्या समर्थकांची देखील या कार्यकारिणीमध्ये स्थान देण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT