Laxman Jagtap passed away
Laxman Jagtap passed away sarkarnama
पुणे

Laxman Jagtap passed away : भाऊंची दिल्लीला जाण्याची इच्छा अधुरीच राहिली; 2014 च्या निवडणुकीने स्वप्नावर फेरले पाणी!

सरकारनामा ब्यूरो

Laxman Jagtap passed away : भारतीय जनता पक्षाचे (BJP) चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप (वय ६०) यांचे मंगळवारी (ता. ३) दीर्घ आजाराने निधन झाले. जगताप यांची गेल्या तीन वर्षांपासून कर्करोगाशी सुरु असलेली झुंज अखेर अपयशी ठरली. जगताप यांच्या निधनामुळे पिंपरी-चिंचवडवर (Pimpri Chinchwad) शोककळा पसरली.

मात्र, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात जगताप यांचा दबदबा होता. मात्र, तरीही त्यांना २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत अपयश आले होते. मात्र, त्यांची खासदार होण्याची इच्छा होती. 'सरकारनामा'ला लक्ष्मण जगताप यांची दीड वर्षापूर्वी विशेष मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीमध्ये बोलताना जगताप यांनी खासदार होण्याची इच्छा बोलून दाखवली होती.

या मुलाखतीमध्ये लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांना प्रश्न विचारण्यात आला होता. विधानसभा झाली, विधान परिषद झाली, आता तुम्ही पुन्हा लोकसभा लढणार का? यावर जगताप यांनी आपण लोकसभा लढण्यासाठी इच्छूक असल्याचे सांगितले होते. तसेच तो निर्णय जर तरचा आहे. मात्र, पक्षाने तिकिट दिले तर आपण नक्कीच निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.

दरम्यान, मागील अनेक दिवसापासून जगताप यांची कर्करोगाशी झुंज सुरु होती. पन्नास दिवस 'आयसीयू'तील उपचारानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यात आमदार जगताप घरी आले होते. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला होता. आपल्या इच्छा शक्तीच्या जोरावर जगताप या आजारावर मात करतील, अशी अपेक्षा होती. मात्र, आज (ता. ३) जगताप यांच्या निधनाची वार्ता आली आणि पिंपरी-चिंचवडवर शोककळा पसरली. मात्र, जगताप यांची खासदार होण्याची इच्छा अधुरी राहिली, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT