Pimpri Chinchwad Fire Sarkarnama
पुणे

Pimpri Chinchwad Fire : 7 निष्पाप महिला कामगारांचे बळी घेणारा कारखाना होता अनधिकृत

Talwade Blast News : बर्निंग वॉर्डचा प्रश्नही आला ऐरणीवर....

उत्तम कुटे

Pimpri Chinchwad News : उद्योगनगरी पिंपरी चिंचवडमध्ये तळवडे येथे एका कारखान्यात शुक्रवारी (ता.८) दुपारी स्फोट होऊन लागलेल्या आगीत 7 निष्पाप महिला कामगारांचा करुण अंत झाला. ही दुर्घटना झालेला कारखानाच अनधिकृत असल्याची खळबळजनक माहिती 'सरकारनामा'च्या हाती लागली आहे.

या आगीत इतर दहा कामगार गंभीर भाजले असून त्यात नऊ महिला आहेत.त्यातील चौघी साठ टक्क्यांहून जास्त भाजल्याने त्यांची प्रकृती सिरीयस आहे.वाढदिवसाच्या केकवर लावण्यात येणार्या स्पार्कलिंग मेणबत्त्या या कारखान्यात बनविल्या जात होत्या.(Fire News)

7 बळी घेणारा हा उद्योग बेकायदेशीर होता.कारण तो रेड झोनमध्ये होता.त्या हद्दीत लष्कराशिवाय इतरांना कसलेही बांधकाम करता येत नाही तसेच त्यासाठी अग्निशमन दलाची आवश्यक असणारी परवानगीही घेण्यात आली नव्हती.त्याला पिंपरी महापालिकेनेही दुजोरा दिला.त्यामुळे महापालिका आणि हा कारखाना असलेल्या देहूरोड पोलिस स्टेशनवर हे प्रकरण शेकण्याची शक्यता आहे.( Talwade )

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बर्निंग वॉर्डचा प्रश्न आला पुन्हा ऐरणीवर

शुक्रवारच्या अग्निकांडाने शहरातीर दोन ज्वलंत आणि गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आले आहेत ‌त्यातील पहिला रेड झोन आणि तेथील हजारो अनधिकृत बांधकामांचा. दुसरा प्रश्न त्यापेक्षा सिरीयस आहे. स्वतंत्र महापालिका, पोलिस आयुक्तालय असलेल्या उद्योगनगरीत अद्याप बर्निंग वॉर्ड नाही. त्यामुळे गंभीर भाजलेल्यांना पुण्यात ससून रुग्णालयात पाठवावे लागते. या आगीतील दहा गंभीर भाजलेल्यांनाही ससूनलाच उपचारासाठी पाठवावे लागले.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT