Nalsab Mulla
Nalsab MullaSarkarnama

Sangli Firing News : मोठी बातमी ! राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची तब्बल आठ गोळ्या झाडून हत्या; सांगली जिल्हा हादरला

NCP Activist Killed by Bullets : गोळीबार करून हत्येचे कारण अद्याप स्पष्ट
Published on

Sangli Crime News: Sangli Crime News: सांगली शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याची तब्बल आठ गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या घटनेने सांगली शहरासह जिल्हा हादरला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून आठ पुंगळ्या जप्त केल्या आहेत. ही घटना शनिवारी (ता. १७) रात्री साठेआठच्या सुमारास घडली आहे. दरम्यान, या हत्येचे कारण स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. (Latest Marathi News)

सांगली शहरातील नालसाब मुल्ला या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यावर हा हल्ला झाला आहे. हल्लेखोराने मुल्ला यांच्यावर तब्बल आठ गोळ्या झाडल्या आहेत. या हल्ल्यात मुल्ला गंभीर जखमी झाले आहेत. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला दोन-तीन गोळ्या लागल्या होत्या. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. त्यांची प्रकृती चिंताजनक होती. तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या खळबळजनक घटनेमुळे सांगलीच्या राजकीय वर्तुळातून चिंता व्यक्त केली जात आहे.

Nalsab Mulla
Pune Shivsena : पुण्यातील शिवसैनिक आक्रमक, थेट पोलीस आयुक्तलयासमोरच आंदोलन; काय आहे कारण ?

सांगली शहरातील नालसाब मुल्ला यांच्या राहत्या घराजवळ हा हल्ला झाला आहे. शहरातील 100 फुटीजवळ ही घटना घडली. राहत्या घराजवळ अज्ञातांनी हल्ला केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हल्लेखोरांनी मुल्ला यांच्यावर आठ गोळ्या झाडल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या हल्ल्याचे कारण अद्याप अस्पष्ट असून या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

Nalsab Mulla
Ayodhya Paul Inc Attack: अयोध्या पौळ शाईफेक प्रकरणी मोठी कारवाई; पोलिसांकडून दोन महिलांना अटक

याबाबत पोलिसांनी सांगितले की, "घटनेचा सखोल तपास सुरू आहे. घटनास्थळावर सात ते आठ पुंगळ्या मिळाल्या आहेत. या गोळीबारामगील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. लवकरच या घटनेचा तपास केला जाईल."

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com