Loksabha Election 2024 : परभणीत ठाकरेंच्या शिलेदाराविरोधात भाजप लढणार? राष्ट्रवादी - शिंदे गट जागा सोडणार की...

BJP Vs Shivsena : राष्ट्रवादी अजित पवार गटाकडूनही परभणीवर दावा....
Parbhani Shivsena News
Parbhani Shivsena NewsSarkarnama
Published on
Updated on

Parbhani News : परभणी लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून भारतीय जनता पक्षाचाच उमेदवार असेल असा पुनरुच्चार विभागीय संघठनमंत्री संजय कौडगे यांनी केला. भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीची पूर्वतयारी जोमात सुरु केली असून डिसेंबर अखेर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मराठवाडा दौरा होणार आहे.

या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या शहर व ग्रामीण कार्यकारिणीची बैठक पार पडली. बैठकीस विभागीय संघटनमंत्री संजय कौडगे यांनी मार्गदर्शन केले. परभणी लोकसभा मतदार संघात भारतीय जनता पक्षाचाच उमेदवार असणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी पूर्ण क्षमतेने तयारीला लागावे आवाहन केले.

Parbhani Shivsena News
BJP : खासदारकी गेली, आता घरे खाली करा; भाजपच्या ‘त्या’ नेत्यांना नोटीस

परभणी लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला असल्यामुळे आजपर्यंत शिवसेना व भाजप(bjp) युतीच्या जागावाटपात परभणी लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे होता. परभणी जिल्ह्यातील जनतेने सातत्याने शिवसेनेचा उमेदवार निवडून दिला आहे. मात्र, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये फुट पडल्यामुळे राजकीय समीकरण बिघडले.

शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर खासदार संजय जाधव (Sanjay Jadhav) हे उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिले. जाधव हे गेली दोन टर्म निवडून आले असल्यामुळे महाविकास आघाडीत सहभागी असलेल्या कॉंग्रेस, शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) यांच्या जागावाटपात परभणी लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे असणार हे उघड आहे. तर भाजप, शिवसेना (शिंदे) व राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार) यांच्या महायुतीच्या जागावाटपात परभणी लोकसभा मतदारसंघ आपल्याकडे खेचण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये रस्सीखेच सुरु आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

2019 च्या लोकसभा निवडणुकीत (LokSabha Election) दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राजेश विटेकर यांनी अजित पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे महायुतीच्या जागावाटपात अजित पवार हे राजेश विटेकर यांच्यासाठी परभणी लोकसभा मतदारसंघाची जागा मागून घेतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. कर्जत येथे झालेल्या अजित पवार गटाच्या अधिवेशनात अजित पवार यांनी यासंदर्भात सुतोवाचही केले होते.

परभणी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसला बळकट करण्यासाठी पक्षाने जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी संजय बनसोडे यांची नियुक्ती केली. तसेच महायुतीच्या जागावाटपात परभणी लोकसभा मतदारसंघ पक्षाला मिळाल्यास राजेश विटेकर हेच उमेदवार असल्याचे संकेत पक्षाने दिले आहेत.

(Edited By Deepak Kulkarni)

Parbhani Shivsena News
Maratha Reservation : मागासवर्गीय आयोगाच्या एकाही सदस्याला कधीच भेटलेलो नाही; चंद्रकांत पाटील असे का म्हणाले?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com