Pune Crime News Sarkarnma
पुणे

Pune Crime Firing News: हा फक्त ट्रेलर… पुढची गोळी डोक्यात.. पिंपरी-चिंचवडमध्ये लॉरेन्स बिश्नोई गँगचा धुमाकूळ; मॉलवर गोळीबार

Lawrence Bishnoi Gang Firing in Pimpri Chinchwad: पिंपरी-चिंचवडमधील AJ फर्निचर मॉलवर लॉरेन्स बिश्नोई गँगच्या शुटर्सकडून गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना. गुंड शुभम लोणकरच्या फेसबुक पोस्टमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे.

Mangesh Mahale

Pimpri Chinchwad firing News: पिंपरी-चिंचवडमध्ये शुक्रवारी रात्री थरारक गोळीबाराची घटना घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली. लॉरेन्स बिश्नोई गँगच्या शार्प शुटर्सनी थेट AJ फर्निचर मॉलवर गोळ्या झाडत व्यावसायिकाला उघड धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे पुणे जिल्ह्यात वाढत चाललेल्या संघटित गुन्हेगारीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

शुक्रवारी रात्री सुमारे 9 वाजून 24 मिनिटांच्या सुमारास दोन अज्ञात हल्लेखोर दुचाकीवरून AJ फर्निचर मॉलसमोर आले. काही क्षणातच त्यांनी हातातील रिव्हॉल्व्हरमधून मॉलच्या दिशेने अंदाजे पाच ते सहा राऊंड फायर केले. गोळ्या थेट मॉलच्या नेमप्लेट आणि काचांवर झाडण्यात आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. गोळीबारानंतर दोन्ही हल्लेखोर वेगाने पसार झाले, असे पोलिसांनी सांगितले.

घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड पोलिसांसह गुन्हे शाखेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराची नाकेबंदी करत फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने पुरावे गोळा केले. घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेण्यात आले असून त्यामध्ये दुचाकीवरून आलेले दोन आरोपी गोळीबार करताना स्पष्ट दिसत असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, या हल्ल्याची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगचा सदस्य म्हणून ओळखला जाणारा शुभम लोणकर याने फेसबुक पोस्टद्वारे स्वीकारल्याचा दावा करण्यात आला आहे. या पोस्टमध्ये AJ फर्निचर मॉलचे मालक अशोक नैन यांच्यावर गंभीर आरोप करत “हा फक्त ट्रेलर आहे, पुढची गोळी थेट डोक्यात असेल,” अशी थेट धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

याचप्रकरणी आता लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ आरजू बिष्णोई यांच्या नावाने एक कथित ऑडिओ क्लिपही व्हायरल झाली आहे. “जो आमच्या विरोधात जाईल, त्याची आणि आमची लवकरच भेट होईल,” असा इशारा या ऑडिओमध्ये देण्यात आल्याचा दावा केला जात आहे. मात्र, ही ऑडिओ क्लिप खरोखरच बिश्नोई गँगशी संबंधित आहे का, याबाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही.

या धक्कादायक घटनेमुळे पिंपरी-चिंचवडसह संपूर्ण पुणे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, बिश्नोई गँग महाराष्ट्रात आपले जाळे विस्तारत असल्याची चर्चा पुन्हा जोर धरू लागली आहे. पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना केली असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT