BMC News: BMCतील वादग्रस्त अधिकाऱ्याचा नवा कारनामा? अभिनेत्याच्या पत्नीची 16 कोटींची फसवणूक; महेश पाटील पुन्हा चर्चेत

BMC officer Mahesh Patil Controversy: BMCचे सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांच्यावर बॉलिवूड अभिनेता जावेद जाफरी यांच्या पत्नी हबीबा जाफरी यांनी 16 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप केला आहे. प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे.
BMC officer Mahesh Patil News
BMC officer Mahesh Patil NewsSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: मुंबई महानगरपालिकेतील काही अधिकाऱ्यांची ‘पॉवर’ नेमकी किती असते, याची चर्चा प्रशासनात कायम सुरू असते. आरोप झाले, चौकशा झाल्या, सक्तीच्या रजेवर पाठवले गेले… तरी काही दिवसांत पुन्हा त्याच अधिकाऱ्यांची ‘महत्त्वाच्या’ पदांवर नियुक्ती होते आणि नंतर पुन्हा नवे वाद समोर येतात. आता असाच एक गाजलेला चेहरा पुन्हा चर्चेत आला आहे.

बीएमसीमधील (BMC) सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांच्याविरोधात बॉलिवूड अभिनेता जावेद जाफरी (Javed Jaffrey) यांच्या पत्नी हबीबा जाफरी यांनी तब्बल 16.24 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप केला आहे. या प्रकरणी खार पोलिसांनी महेश पाटील यांच्यासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तपास आता मुंबई गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलकडे वर्ग करण्यात आला आहे.

वर्षभरापूर्वीच खंडणी आणि मारहाण प्रकरणात चर्चेत आलेल्या महेश पाटील यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते. मात्र प्रशासनातील ‘आशीर्वाद’ इतका मजबूत होता की, काही महिन्यांतच त्यांची पुन्हा महत्त्वाच्या पदावर नियुक्ती झाली. त्यामुळे “BMCमध्ये कारवाई होते की फक्त फाईल हलते?” असा सवाल आता पुन्हा उपस्थित केला जात आहे.

BMC officer Mahesh Patil News
PM Modi Foreign Visit: पेट्रोल-गॅस संकटात PM मोदींचा 5 देशांचा दौरा; भारतासाठी काय घेऊन येणार? 5 मुद्द्यांत जाणून घ्या

नेमके आरोप काय?

हबीबा जाफरी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, वांद्रे पश्चिम येथील पुनर्विकास प्रकल्पात मोठा नफा मिळवून देण्याचे आश्वासन देत त्यांना गुंतवणुकीसाठी प्रवृत्त करण्यात आले. महेश पाटील यांनी स्वतः या प्रकल्पाची माहिती देत “सरकारी पातळीवर सर्व काही क्लिअर” असल्याचा विश्वास दिल्याचा आरोप आहे.

तक्रारीनुसार, आरोपींनी सरकारी नोंदणीची कागदपत्रे दाखवत हा प्रकल्प सुरक्षित असल्याचे सांगितले. त्यानंतर चेक, रोख रक्कम, विदेशी चलन आणि महागड्या घड्याळांच्या स्वरूपात तब्बल 16 कोटींपेक्षा जास्त रक्कम उभी करण्यात आली. मात्र पैसे घेतल्यानंतर ना घरे मिळाली, ना गुंतवणूक परत मिळाली. त्यामुळे अखेर जाफरी कुटुंबीयांनी पोलिसांकडे धाव घेतली.

BMC officer Mahesh Patil News
NEET UG News: नीट पेपर लीकनंतर मोठा निर्णय; पुढील वर्षी NEET ऑनलाइन होणार, शिक्षणमंत्री धर्मेद्र प्रधान यांची घोषणा

‘तोच’ निशीत पटेल पुन्हा समोर

या प्रकरणात व्यावसायिक निशीत पटेल यांचे नाव पुन्हा समोर आले आहे. विशेष म्हणजे, 2025 मध्ये ज्यांनी महेश पाटील यांच्यावर खंडणीसाठी मारहाण केल्याचा आरोप केला होता, तेच निशीत पटेल आता या कथित फसवणूक प्रकरणात सहआरोपी आहेत.

हाय-प्रोफाईल प्रकरण

मुंबई गुन्हे शाखेच्या ‘प्रॉपर्टी सेल’ने फसवणूक प्रकरणात मोठी कारवाई करत व्यावसायिक निशित पटेल याला अटक केली आहे. या हाय-प्रोफाईल प्रकरणात महेश पाटील यांच्यासह एकूण सहा जणांना आरोपी करण्यात आले आहे. आता तपास अधिक वेगाने सुरू झाला आहे.

BMC officer Mahesh Patil News
IAS Transfer: फडणवीस सरकारचा बदल्यांचा धडाका; डॉ. पुलकुंडवार ग्रामविकास विभागाचे नवे सचिव, चार IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

BMCतील ‘नेटवर्क’वर प्रश्नचिन्ह

या प्रकल्पात केवळ जाफरी कुटुंबीयांनीच नव्हे, तर निवृत्त पोलीस अधिकारी, BMC अधिकारी, कलाकार आणि निवृत्त न्यायाधीशांनीही मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केल्याचा शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे आता प्रश्न उपस्थित होतोकी, इतक्या मोठ्या प्रमाणावर पैसे गोळा करणाऱ्या या प्रकल्पाला नेमका कोणाचा राजकीय आणि प्रशासकीय पाठिंबा होता? तसेच गंभीर आरोप असतानाही संबंधित अधिकाऱ्यांना पुन्हा संवेदनशील पदांवर पोस्टिंग कशी मिळाली?

BMC officer Mahesh Patil News
Mumbai Pune Expressway Alternative: मुंबईला जाण्यासाठी पुणेकरांना नवा सुपरफास्ट मार्ग; नेरळ-शिरूर महामार्गाला हिरवा कंदील

‘सक्तीची रजा’ की क्लीन चिट?

28 नोव्हेंबर 2025 रोजी महेश पाटील यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते. त्यावेळी तत्कालीन महापालिका आयुक्त भूषण गगराणी आणि पोलीस प्रशासनाने प्रकरणाची गंभीर दखल घेतल्याचे सांगितले गेले होते.

मात्र काही काळातच ते पुन्हा सेवेत रुजू झाले आणि के-साऊथ वॉर्डसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी त्यांची नियुक्ती झाली. त्यामुळे “प्रशासनात कारवाईपेक्षा व्यवस्थाच जास्त मजबूत आहे का?” असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

आता या प्रकरणात मुंबई पोलिसांची तपास यंत्रणा नेमकी किती खोलवर जाते आणि या कथित फसवणूक रॅकेटमागील मोठी नावे समोर येतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com