PCMC Sarkarnama
पुणे

PCMC : पिंपरी-चिंचवड महापालिकेची प्रभाग रचना जाहीर, कोणाला फायदा?

PCMC Ward Structure : पिंपरी-चिंचवड महापालिकेची प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. चार सदस्यांच्या प्रभाग रचनेते 218 नगरसेवक असणार आहे.

Roshan More

PCMC News : पिंपरी-चिंचवड महापालिकेची बहुचर्चित बहुप्रतिक्षिते प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. प्रभाग रचनेत बदल होऊन सत्ताधाऱ्यांच्या सोयीप्रमाणे प्रभाग रचना होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती मात्र, 2017 च्या निवडणुकांप्रमाणे ही प्रभाग रचना ठेवण्यात आली आहे. प्रभाग रचनेत 32 प्रभाग असून 128 नगरसेवक असणार आहे.

तब्बल 2017 मध्ये महापालिकेची निवडणूक झाली होती. त्यावेळी भाजप सत्तेत आली होती. आता तब्बल साडेआठ वर्षांनी निवडणूक होणार असून चार सदस्यीय प्रभाग रचनेनुसार निवडणूक होणार आहे. प्रभाग रचना ही 2011 च्या जनगणनेनुसार करण्यात आली आहे. त्यामुळे प्रभाग तेच असले तरी त्यातील लोकसंख्या वाढली आहे.

नागरिकांना ४ सप्टेंबरपर्यंत प्रभाग रचनेवर हरकती नोंदवण्याची संधी आहे. तर, हरकतींवर २९ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीत सुनावणी होणार आहे. तीन ते सहा ऑक्टोबरदरम्यान राज्य निवडणूक आयोग अंतिम मंजुरी देणार असून त्यानंतर प्रत्यक्ष प्रभाग रचना जाहीर होईल.

प्रत्येक प्रभागात किमान 49 हजार मतदार

प्रत्येक प्रभागात किमान 49 हजार ते कमाल 59 हजार मतदार असतील. मात्र मतदारांची ही संख्या 2011 च्या निवडणुकीनुसार असणार आहे. त्यामुळे 15 वर्षांत मतदारांची झालेल्या वाढीची नोंद यामध्ये नाही. प्रभाग रचनेला अंतिम मान्यता मिळाल्यानंतर अंतिम प्रभाग रचनेला मंजुरी मिळाल्यानंतर आरक्षणानुसार जागा निश्चित करण्यात येतील. 128 पैकी 93 जागा आरक्षित असतील.

कोणाला किती जागा?

महिला : ६४ जागा

पुरुष : ६४ जागा

एससी : 20 जागा

एसटी : 3 जागा

ओबीसी : 35 जागा

सर्वसाधारण महिला (खुला) : 35 जागा

- सर्वसाधारण (खुला) : ३५ जागा

प्रभाग क्रमांक - एकूण लोकसंख्या - अनुसूचित जाती - अनुसूचित जमाती

१ - ५७१४९ - ७७५९ - ७५१

२ - ५७६९४ - ७५३४ - ८२२

३ - ५१६२८ - ६८२८ - १०७५

४ - ५५५३९ - ७७९७ - ४२८६

५ - ४९०४९ - ५४३७ - १२१४

६ - ५३१२० - ४७०० - १८००

७ - ५३०६७ - ४६८३ - ८२८

८ - ५०१६४ - ७१९१ - १०९०

९ - ५९३९० - ११६६३ - ६१०

१० - ५५६९९ - ९२९१ - ८६०

११ - ५२८७८ - ९९६३ - ८६५

१२ - ५७३१३ - ६८०६ - १२६०

१३ - ५५०७४ - १५७७० - ७०५

१४ - ५६४२७ - ५३९१ - ५९५

१५ - ५१८५६-३३९२-४५७

१६ - ५९३३०- १०३३७ - १८६४

१७ - ५९०८९ - ७८८९- ८५७

१८ - ५५०१२ - ४०७१ - ४४६

१९ - ५४७६९ - २१५८७ - ३८९

२० - ५३५४९ - १११९८-९३२

२१ - ५६८०० - ९६७४ - ५२१

२२ - ५८७१०-७३३३- ६३३

२३ - ४९८४८ - १११३८ - ७१३

२४ - ५०२४३ - ७०४७- ७१९

२५ - ४९९६४- १०७७०-११०५

२६ - ४९८४७ - ७१७२-१२१४

२७ - ५०३२१ - ८१२८ -६९८

२८ - ५१५५० - ५५३७ - ६६२

२९ - ४९१४६ - ८०४५ - ३३५६

३० - ५७००४ - १३०५६ - १९१२

३१ - ५१८४९ - ७५५४ - १५५८

३२ - ५४६१४ - ९०६९ - १७३८

एकूण : १७२७६९२ - २७३८१० - ३६५३५

---------------

प्रभाग

प्रभाग क्रमांक १ - चिखली गावठाण भाग, पाटीलनगर, गणेशनगर, मोरेवस्ती भाग, सोनवणे वस्ती

प्रभाग क्रमांक २ चिखली गावठाण भाग, रिव्हर रेसिडन्सी, क्रिस्टल सिटी, स्वराज रेसिडन्सी, गंधर्व एक्सलन्स बनकर वस्ती, बोऱ्हाडेवाडी, जाधववाडी, राजे शिवाजीनगर, कुदळवाडी भाग

प्रभाग क्रमांक ३ - मोशी गावठाण, गंधर्वनगरी, संत ज्ञानेश्वरनगर भाग, साई मंदिर परिसर, गोखले मळा,, वडमुखवाडी, काळजेवाडी, पठारेमळा, ताजणेमळा, चोवीसावाडी, चहोली. डुडूळगाव

प्रभाग क्रमांक ४ - दिघी गजानन महाराजनगर, भारतमातानगर, गायकवाडनगर, भंडारी स्कायलाइन, समर्थनगर, कृष्णानगर आदी, भाग २

प्रभाग क्रमांक ५ - रामनगर, तुकारामनगर, गुरुदत्त कॉलनी, गंगोत्रीपार्क, सावंतनगर, महादेवनगर, गवळीनगर, श्रीराम कॉलनी, ज्ञानेश्वरनगर, चक्रपाणी वसाहत

प्रभाग क्रमांक ६ - धावडेवस्ती, भगत वस्ती, गुळवेवस्ती, चक्रपाणी वसाहत भाग, पांडवनगर, रोशल गार्डन, सद्गुरूनगर

प्रभाग क्रमांक ७ - शीतलबाग, सेंच्युरी एन्का कॉलनी, सुविधा पार्क, आपटे कॉलनी, सॅन्डवीक कॉलनी, खंडोबामाळ, गव्हाणे वस्ती, भोसरी गावठाण, लांडेवाडी, शांतीनगर

प्रभाग क्रमांक ८ जय गणेश साम्राज्य, जलवायू विहार, केंद्रीय विहार, महाराष्ट्र कॉलनी, इंद्रायणीनगर, खंडेवस्ती, गवळीमाथा, बालाजीनगर

प्रभाग क्रमांक ९ - टाटा मोटर्स, यशवंतनगर, विठ्ठलनगर, उद्मनगर, स्वप्ननगरी, अंतरीक्ष सोसायटी, अजमेरा सोसायटी, वास्तुउद्योग, मासूळकर कॉलनी, महिंद्रा रॉयल, खराळवाडी, गांधीनगर, नेहरूनगर

प्रभाग क्रमांक १० - मोरवाडी, लालटोपीनगर, इंदिरानगर, सरस्वती विश्व विद्यालय, आंबेडकर कॉलनी, दत्तनगर, शाहूनगर, विद्यानगर, वृंदावन सोसायटी, संभाजीनगर

प्रभाग क्रमांक ११ - नेवाळे वस्ती, हरगुडे वस्ती, कुदळवाडी भाग, कृष्णानगर, शरदनगर, कोयनानगर, महात्मा फुलेनगर, पूर्णानगर, घरकुल प्रकल्प, अजंठानगर, दुर्गानगर

प्रभाग क्रमांक १२ - तळवडे गावठाण, एमआयडीसी आयटी पार्क, ज्योतिबा मंदिर परिसर, सहयोगनगर, रूपीनगर, त्रिवेणीनगर, ताम्हाणे वस्ती

प्रभाग क्रमांक १३ - निगडी गावठाण, सेक्टर २२, ओटास्कीम, म्हेत्रेवस्ती, यमुनानगर, माता अमृतानंदमयी मठ परिसर, श्रीकृष्ण दिर, साईनाथनगर

प्रभाग क्रमांक १४ - चिंचवड स्टेशन, महावीर पार्क, मोहननगर, रामनगर, काळभोरनगर, शुभश्री सोसायटी, जयगणेश व्हिजन, विवेकनगर, विठ्ठलवाडी, बजाज ऑटो, दत्तवाडी, तुळजाईवस्ती

प्रभाग क्रमांक १५- आकुर्डी गावठाण, गंगानगर, वाहतूक नगरी, सेक्टर न २४, २५, २६, २७, २८, सिंधूनगर, परमार पार्क, स्वप्नपूर्ती सोसायटी, केंद्रीय वसाहत

प्रभाग क्रमांक १६ - वाल्हेकरवाडी भाग, गुरुद्वारा, शिंदे वस्ती, रॉयल कासा सोसायटी, सेक्टर २९, नंदगिरी सोसायटी, विकासनगर, क्रिस्टल सिटी, मामुर्डी, किवळे

प्रभाग क्रमांक १७- दळवीनगर, प्रेमलोक पार्क, भओईरनगर, गिरीराज सोसायटी, रेलविहार सोसायटी भाग, शिवनगरी, बिजलीनगर

प्रभाग क्रमांक १८- एस के एफ कॉलनी, रस्टन कॉलनी, पवनानगर, वेताळनगर, चिंचवड गावठाण, केशवनगर तानाजीनगर, काकडे पार्क, मोरया राज पार्क

प्रभाग क्रमांक १९ - विजयनगर, उद्योगनगर, सुदर्शननगर, श्रीधरनगर, आनंदनगर, भोईल कॉलनी, गावडे पार्क, भीमनगर, सम्राट अशोकनगर, भाटनगर, भाजी मंडई पिंपरी कॅम्प

प्रभाग क्रमांक २० - विशाल थिएटर परिसर, एच ए कॉलनी, महेशनगर, संत तुकारामनगर, महात्मा फुलेनगर, वल्लभनगर, लांडेवाडी, कासारवाडी, कुंदननगर

प्रभाग क्रमांक २१ - मिलिंदनगर, सुभाषनगर, गौतमनगर, आदर्शनगर, इंदिरानगर, शास्त्रीनगर, बलदेवनगर, गणेशनगर, जिजामाता रुग्णालय, संजय गांधीनगर, वैभवनगर, अशोक थिएटर, मासूळकर पार्क, पिंपरीगाव, तपोवन मंदिर

प्रभाग क्रमांक २२- काळेवाडी विजयनगर, निर्मलनगर, आदर्शनगर, पवनानगर, ज्योतिबा नगर, नढेनगर

प्रभाग क्रमांक २३ - प्रसूनधाम, गंगा आशियाना, कुणाल रेसिडेन्सी, स्विस काऊंटी, थेरगाव गावठाण, पडवळनगर भाग, अशोका सोसायटी, साईनाथनगर, समर्थ कॉलनी आदी

प्रभाग क्रमांक २४ - आदित्य बिर्ला रुग्णालय, दत्तनगर, पद्मजी पेपरमिल, गंगा ओशियन मिडोज, पडवळनगर, गणेशनगर, म्हतोबानगर, प्रथम सोसायटी, क्रांतीनगर, महाराष्ट्र कॉलनी, यशदा कॉलनी, गुजरनगर, मंगलनगर

प्रभाग क्रमांक २५ - माळवाडी, पुनावळे, पंढारे वस्ती, काटेवस्ती, नवले वस्ती, ताथवडे, अशोकाकनगर, निंबाळकरगनर, भूमकरवस्ती, वाकड, काळा खडक, मुंजोबानगर, मानेवस्ती, भुजबळ वस्ती, वाकडकर वस्ती

प्रभाग क्रमांक २६ - पिंपळे निलख, विशालनगर, पार्कस्ट्रीट, कस्पटेवस्ती, अनमोल रेसिडेन्सी, धनराज पार्क, दत्तमंदिर, अण्णाभाऊ साठेनगर, वेणूनगर भाग, रक्षक सोसायटी

प्रभाग क्रमांक २७ - तापकीरनगर, श्रीनगर, शिवतीर्थनगर, बळीराम गार्डन, रहाटणी गावठाण, सिंहगड कॉलनी, रायगड कॉलनी, लक्ष्मीबाई तापकीर शाळा परिसर, आकाशगंगा सोसायटी

प्रभाग क्रमांक २८ - फाइव्ह गार्डन, शिवार गार्डन, प्लनेट मिलेनियम, कापसे लॉन, रामनगर, पिंपळे सौदागर, कुणाल आयकॉन, गोविंद गार्डन

प्रभाग क्रमांक २९ - कल्पतरू इस्टेट, क्रांतीनगर, काशीद पार्क, गगनगिरी पार्क, जवळकरनगर, शिवनेरी कॉलनी, गुलमोहर कॉलनी, ओंकार कॉलनी, गोकुळनगरी, भालेकरनगर, पिंपळे गुरव, सुदर्शननगर

प्रभाग क्रमांक ३० - शंकरवाडी भाग, सरिता संगम सोसायटी, शास्त्रीनगर, केशवनगर, कासारवाडी भाग, कुंदननगर भाग, फुगेवाडी, संजयनगर, दापोडी, सिद्धार्थनगर, गणेशनगर, सुंदरबाग कॉलनी, एस टी वर्क शॉप

प्रभाग क्रमांक ३१ - राजीव गांधीनगर, गजानन महाराजनगर, कीर्तीनगर, विनायकनगर, गणेशनगर, कवडेनगर, गांगार्डनगर भाग, विद्यानगर, उरो रुग्णालय

प्रभाग क्रमांक - ३२ सांगवी गावठाण

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT