PMC Election 2025: भाजपचेच वर्चस्व; राष्ट्रवादीचं टेन्शन वाढलं; नव्या प्रभाग रचनेचा फायदा भाजप अन् शिवसेनेला होणार

Pune Municipal Corporation elections PMC ward structure 2025: प्रभाग मोठे केल्यानं उपनगरात नगरसेवकांची संख्या वाढण्यावर मर्यादा आली आहे. त्याचा सर्वाधिक फटका राष्ट्रवादीला बसणार आहे.
PMC
PMCSarkarnama
Published on
Updated on

Summary

  1. पुणे महापालिकेची नवी प्रभाग रचना जाहीर झाली असून ४१ प्रभागांमध्ये १६५ नगरसेवक निवडले जाणार आहेत.

  2. भाजपचे वर्चस्व स्पष्ट झाले असून प्रभाग फेरबदलाचा सर्वाधिक फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसणार आहे.

  3. उपनगर भागात मोठे फेरबदल झाले तर मध्यवर्ती प्रभाग कायम ठेवले गेले; त्यामुळे उपनगरातील इच्छुकांचे गणित बिघडले आहे.

पुणे महापालिकेचा प्रभाग रचना जाहीर झाली आहे. राज्य सरकारने महापालिकेच्या निवडणुकीसाठी चार सदस्यांचा एक प्रभाग करण्याचा निर्णय घेतला. मध्यवर्ती पेठेतील भागातील प्रभागात फेरबदल करण्यात आलेले नाही, पण उपनगर परिसरातील प्रभागात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. त्यामुळे उपनगरातील इच्छुकांची दमछाक होणार असल्याचे चित्र आहे.

राज्यात महायुतीचे सरकार असल्याचे तीनही घटक पक्षांचा झुकते माफ प्रभाग रचनेत मिळेल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती, मात्र शुक्रवारी जाहीर झालेल्या प्रभाग रचनेत भाजपने आपल्या सोयीनुसार बदल केले असून प्रभाग रचनेत भाजपचे वर्चस्व असल्याचे स्पष्ट झाले आहे.

संख्या वाढण्यावर मर्यादा

प्रभाग मोठे केल्यानं उपनगरात नगरसेवकांची संख्या वाढण्यावर मर्यादा आली आहे. त्याचा सर्वाधिक फटका राष्ट्रवादीला बसणार आहे. अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची ताकद असलेल्या प्रभागात फेरबदल करण्यात आल्याने राष्ट्रवादीतील इच्छुकांचे टेन्शन वाढलं आहे. नव्या प्रभाग रचनेचा फायदा मात्र भाजप आणि शिवसेनेला होणार असल्याचे दिसते.

भाजपचा अप्रत्यक्ष दबाव

पुण्याचा मध्यवर्ती भाग म्हणजे कोथरूड,पर्वती, शिवाजीनगर येथील विधानसभा मतदारसंघांतील प्रभागांची संख्या कमी होणार नाही, याची 'काळजी' महायुतीने घेतली आहे. पुण्याच्या प्रभाग रचनेवर भाजपचा अप्रत्यक्ष दबाव होता, असा आरोप काही राजकीय नेत्यांनी केला आहे.

PMC
Political Horoscope: ट्रम्प यांच्यासाठी प्रतिकूल काळ; महाभियोग आणला जाऊ शकतो...

भाजपचेच वर्चस्व

राज्यात महायुतीची सत्ता असल्याने प्रभागरचनेत तिन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या सोयीचे प्रभाग होतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, आज प्रारूप प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर यावर फक्त भाजपचेच वर्चस्व असल्याचे स्पष्ट झाले.

PMC
Harshvardhan Sapkal: किती शेतकऱ्यांचे बळी घेतल्यावर कर्जमाफी करणार? फडणवीस, अजितदादा, शिंदे यांच्यावर सपकाळ संतापले
  • आगामी महापालिका निवडणुकीसाठी एकूण 41 प्रभाग असणार

  • निवडून द्यावयाच्या महानगरपालिका सदस्यांची संख्या १६५ आहे

  • यात ४० प्रभाग चार सदस्यीय तर एक प्रभाग पाच सदस्यीय आहे.

  • एकूण ४१ प्रभागांपैकी प्रभाग क्र. ३८ हा ५ सदस्यीय आहे.

  • पुणे महानगरपालिका क्षेत्राची एकूण लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार ३४,८१,३५९ इतकी आहे.

  • अनुसूचित जातीची लोकसंख्या ४,६८,६३३ इतकी आहे, व अनु सूचित जमातीची लोकसंख्या ४०,६८७ इतकी आहे.

  • २०१७ मधील प्रभाग ३८ बालाजीनगर-राजीव गांधीनगर प्रभागाचे पाच तुकडे करून ते पाच प्रभागांना जोडले आहेत.

❓ 4 FAQ

Q1. पुणे महानगरपालिकेत किती प्रभाग निश्चित झाले आहेत?
➡ एकूण ४१ प्रभाग निश्चित झाले आहेत.

Q2. यंदा किती नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत?
➡ एकूण १६५ नगरसेवक निवडून येणार आहेत.

Q3. नव्या प्रभाग रचनेत कोणाला फटका बसणार आहे?
➡ राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक फटका बसणार आहे.

Q4. कोणत्या पक्षाला या रचनेचा सर्वाधिक फायदा होणार आहे?
➡ भाजप आणि शिवसेनेला नव्या प्रभाग रचनेचा फायदा होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com