Pimpri Chinchwad News : Ajit Pawar : Devendra Fadnavis : chinchwad
Pimpri Chinchwad News : Ajit Pawar : Devendra Fadnavis : chinchwad Sarkarnama
पुणे

Pimpri Chinchwad News : चिंचवडच्या निकालाने जागली राष्ट्रवादीची आशा, तर भाजपसाठी धोक्याची घंटा!

सरकारनामा ब्यूरो

Pimpri Chinchwad News : चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक भाजपने जिंकली असली तरी, मात्र भाजपला ही निवडणूक अवघड गेली, ही वस्तुतिथी नाकारता येणार नाही. चिंचवड विधानसभा निवडणुकीच्या इतिहासात घड्याळाला पहिल्यांदाच लाखभर मतांचा टप्पा गाठता आला. यामुळे आगामी पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुका भाजपसाठी सोपे राहिलेले नाही, हेच पोटनिवडणुकीच्या मतांच्या आकडेवारीवरून अधोरेखित होत आहे.

चिंचवड विधानसभा मतदारसंघ २००९ मध्ये अस्तित्वात आली. २००९ पासून आतापर्यंत एकूण चार वेळा येथे विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. राज्यातील मतदारसंख्येच्या दृष्टीने चिंचवड हा सर्वात मोठा मतदारसंघ आहे. या एकट्या मतदारसंघामध्ये महापालिकेच्या तब्बल १३ प्रभागांचा समावेश होतो. एका प्रभागातून चार नगरसेवक असे, तब्बल ५२ नगरसेवक एकट्या चिंचवड विधानसभा मतदार संघातून निवडून जातात. मागील महापालिका निवडणुकीमध्ये भाजपने येथे करिष्मा दाखवला होता. एकट्या भाजपनचे चिंचवडमधून ३३ नगरसेवक निवडून आले होते.

दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचा चिंचवडवर दबदबा होता. सुरूवातीपासूनच जगतापांचे या मतदारसंघात वर्चस्व होते. पोटनिवडणुकीत अश्विनी जगताप यांचा विजय झाला असला तरी, जगताप यांचे मताधिक्य घटलेले दिसून आले. तब्बल १५ हजारांचे आसपास भाजपची मते कमी झाले. संपूर्ण मतदारसंघाचा विचार करता, ज्या पद्धतीने भाजपला मताधिक्याची अपेक्षा होती, त्याला धक्का बसल्याचे दिसून आले.

दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या उणीवामुळे महाविकास आघाडीने लाखभर मतांचा टप्पा गाठला. ही मते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला येत्या महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने उर्जा देणारी आहे. त्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुका भाजपसाठी सोपी राहिलेली नाही.

तिरंगी लढतीमुळे मतविभागणी झाली, सहानुभूतीची ही काही मते भाजपच्या पारड्यात पडली. पण यापुढे भाजपला सत्ता कायम ठेवण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागणार आहे.अजित पवारांनी पोटनिवडणूक गांभीर्याने घेतल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी झोकून काम केले. लाखाचा टप्पा ओलंडल्याने येत्या पालिकेच्या निवडणूकीत राष्ट्रवादीत उर्जा निर्माण झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT