Pimpri Chinchwad News : Eknath Shinde : Devendra Fadnvis Sarkarnama
पुणे

Pimpri Chinchwad News : शास्ती कर माफीबद्दल मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचा पिंपरी-चिंचवडकर करणार नागरी सत्कार!

Shrirang Barane : आचारसंहिता संपताच हा शास्तीकर माफीचा जीआर काढण्यात आला.

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील शास्तीकर रद्दचा नाही, तर माफीचा `जीआर` राज्य सरकारने नुकताच (ता.३ मार्च) काढल्याने ३१ हजार ६१६ रहिवाशांचे ४६० कोटी ५५ लाख रुपये माफ झाले. त्यामुळे पिंपरी-चिंचवडकर हे लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा नागरी सत्कार करणार आहेत.

या पश्नावर दिलेला शब्द पाळल्याने एका खासगी कार्यक्रमासाठी पुण्यात आलेल्या मुख्यमंत्र्यांची बारणेंनी भेट घेवून त्यांचे आभार शिवसेना उपनेते, खासदार श्रीरंग बारणे यांनी मानले. तसेच याबद्दल मुख्यमंत्र्यांचा नागरी सत्कार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. शहरवासीयांच्या वतीने करण्यात येणाऱ्या या सत्कारासाठी वेळ देण्याची त्यांनी विनंती केली. मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आणि कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यावेळी उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड शहरातील ५ लाख ९१ हजार १५० मालमत्तांपैकी ९७ हजार ६९९ अवैध मालमत्तांना शास्तीकर लागू झाला होता. त्यातील एक हजार चौरस फुटापर्यंतच्या ६० हजार ८३ अवैध मालमत्तांचा हा कर भाजप-शिवसेनेचे सरकार असताना, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माफ केला होता. तर, चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा कर पूर्ण माफ केला जाईल, आचारसंहिता संपताच त्याबाबत जीआर काढला जाईल, असे आश्वासन दिले होते.

आचारसंहिता संपताच हा जीआर काढण्यात आला. प्राधिकरण बाधित शेतकऱ्यांना साडेबारा टक्के परतावा देण्याचा प्रश्नही लवकरच निकाली निघेल,असा विश्वास खासदार बारणे यांनी आता व्यक्त केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT