Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत प्रवेश; हजारोंचा जनसागर अन् संजय कदमांचा, रामदास कदमांवर जोरदार हल्लाबोल

Sanjay Kadam News : उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत संजय कदम यांचा ठाकरे गटात प्रवेश
Sanjay Kadam News
Sanjay Kadam NewsSarkarnama
Published on
Updated on

Konkan News : कोकणातील राजकारण या गद्दार लोकांनी नागरिकांच्या मनात संभ्रम निर्माण केला आहे. कोकणातील लोकांनी दाखवून दिले आहे की आम्ही पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोहत आहोत. मतदार यादीत नाव नसताना शिवसेनेने मला विभाग प्रमुख पदाची संधी दिली, असे पक्षप्रवेशानंतर माजी आमदार संजय कदम म्हणाले.

माजी आमदार संजय कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून (NCP) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी त्यांनी माजी मंत्री रामदास कदम यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, आम्ही रामदास कदम यांना निवडून दिले, ते मुंबईत जाऊन नेते झाले. पण आता गद्दर झाले आहेत. उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे, म्हटल्यावर त्यांनी कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या, असा आरोप संजय कदम यांनी केला.

Sanjay Kadam News
Uddhav Thackeray News : उद्या दिवस फिरल्यानंतर त्यांच्या घरादारांची काय हालत होईल; ठाकरेंचा इशारा

खेड तालुक्यातील रामदास कमद (Ramdas Kadam) यांच्या जवळच्या नेत्यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्याचेही संजय कदम यांनी सांगितले. शिंदे गटातील अनेक कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. शिवसेनेचे चिन्ह आणि नाव काढून घेतल्यानंतर अनेक कार्यकर्ते ठाकरे गटात, आल्याचे कदम म्हणाले. सभेला आलेली ही लोक चिडून आली आहेत. मी राष्ट्रवादीत होतो, मला आमदारकी दिली होती. पण शिवसेनेच्या कठीण काळात माझ्या मधला शिवसैनिक जागा झाला, असेही संजय कदम म्हणाले.

दरम्यान, या वेळी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री अनित शाह यांच्यावर जोरदार टीका केली. मेघालयात जाऊन संगमा यांच्यावर टीका केली. निवडणुकीनंतर आता त्यांच्यासोबत जाऊन सत्ता स्थापन केली. अमित शाह पुण्यात येवून बोलले होते, की उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीचे तळवे चाटले, मग आता तुम्ही संगमांसोबत काय करत आहात, असा हल्लाबोल ठाकरे यांनी केला.

Sanjay Kadam News
Uddhav Thackeray News : उद्धव ठाकरेंच्या सभेची जय्यत तयारी; कार्यकर्त्यांकडून मोठे शक्तीप्रदर्शन

निवडणूक आयोगाने चोंबडेपणा करायचा नाही. तुमच्या परवानगीने शिवसेना स्थापन झालेली नाही. मुंबईत आशीर्वाद यात्रा काढत आहेत, त्यांना तुम्ही आशीर्वाद देणार आहात का? धणुष्यबाण हातत घेताल पण कपाळावर जो गद्दारीचा शिक्का आहे, तो कसा पुसणार? काय चूक केली होती, कोरोनात चांगले काम केले ही चूक होती का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com