Vasant More On Murlidhar Mohol sarkarnama
पुणे

Vasant More: वसंत मोरेंनी काढले खासदार मोहोळ यांच्या ड्रोन शोचं कोटेशन; इतका खर्च झाल्याचा दावा

Pune Drone Show on Narendra Modi Birthday: वसंत मोरे यांनी खासदारांचा ड्रोन शो ज्या कंपनीने केला त्या कंपनीकडून दिवाळीमध्ये ड्रोन शो करायचा असल्याचं सांगून इस्टिमेट काढून घेतला असल्याचा दावा केला आहे.

Sudesh Mitkar

Pune News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ड्रोन लाईट शो आयोजन पुण्यात केले होते. हा ड्रोन शो पुण्यामध्ये चर्चेचा विषय बनला होता. आता या चर्चा बरोबरच हा टीकेचा देखील विषय बनला आहे. या ड्रोन शो साठी करण्यात आलेल्या खर्चावरून विरोधक मुरलीधर मोहोळ यांच्यावर निशाणा साधत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते वसंत मोरे यांनी या ड्रोन शोचे बजेटच समोर मांडले आहे.

अयोध्या आणि वाराणसीनंतर महाराष्ट्रात प्रथमच गाजावाजा करत ड्रोन शोचे आयोजन खासदार मोहोळ यांनी पुण्यात केले. ड्रोन च्या माध्यमातून थ्रीडी स्वरूपात असलेला हा शो ४५ मिनिटे चालला. त्यात मोदी सरकारच्या कामगिरीसह पुण्याच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक मानबिंदूंचे दर्शनही पुणेकरांना घडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. हजारो ड्रोन्स जेव्हा अवकाशात झेपावले, तेव्हा पुण्याच्या ३-४ किलोमीटर परिसरातील नागरिकांना हा शो पाहता आला.

जेवढी या शोच्या अनोख्या स्वरूपामुळे चर्चा झाली. तितकीच समाज माध्यमांवर या शोबाबत टीका देखील करण्यात आली. ड्रोन उडवताना पुण्याच्या रस्त्यावरील खड्डे आणि नागरी समस्या दिसतात का? असा सवाल सोशल मीडियाच्या माध्यमातून खासदारांना विचारण्यात आला होता. तसेच एवढ्या मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात आलेल्या ड्रोन शोसाठी किती खर्च झाला, याबाबतच्या चर्चा देखील सोशल मीडिया वर रंगल्या आहेत.

त्यानंतर आता वसंत मोरे यांनी या ड्रोन शोच्या खर्चाचं इस्टिमेट काढला आहे. त्यानुसार या ड्रोन शोसाठी कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आले असल्याचं सांगितलं जात आहे. वसंत मोरे यांनी खासदारांचा ड्रोन शो ज्या कंपनीने केला त्या कंपनीकडून दिवाळीमध्ये ड्रोन शो करायचा असल्याचं सांगून इस्टिमेट काढून घेतला असल्याचा दावा केला आहे.

वसंत मोरे म्हणाले, "नुकताच पुण्यात ड्रोन शो झाला.आपण म्हटलं कंपनीला विचारावं किती खर्च येतो कंपनीने हे कोटेशन दिले आहे. १००० ड्रोन आकाशात अर्धा तास उडविण्यासाठी एक कोटी रुपये. एवढा खर्च करण्यात आला तसंच या कार्यक्रमासाठी इतर देखील खर्च होता त्यामुळे कोट्यावधी रुपये या कार्यक्रमासाठी खर्च करण्यात आले. या 1 कोटी रुपयांमध्ये आमच्या पुण्यातील ससून रुग्णालयाचे किती काम झाले असते तेव्हा हवेत उडणाऱ्यांनी थोडं जमिनीवरही लक्ष द्यावं..., अन्यथा महापालिका निवडणुकीमध्ये पुणेकर नागरिक तुम्हाला 'आसमान' दाखवतील अशी टीका वसंत मोरे यांनी केली आहे.

हा ड्रोन शो पुणेकरांनाही देखील रुचला नसल्याचं वसंत मोरे यांनी सांगितलं या ड्रोन शोबाबत सोशल मीडिया वर खासदारांनी पोस्ट केल्यानंतर त्यावर असंख्य निगेटिव्ह कमेंट्स आल्या होत्या. मात्र त्या कमेंट खासदारांनी डिलीट करण्यासाठी माणसं बसवली असल्याचा देखील आरोप वसंत मोरे यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT