Garba 2025: गरबा-दांडिया फक्त हिंदूंसाठीच!मुस्लिमांना ‘नो एंट्री’; आधार तपासूनच प्रवेश

Navratri Garba Entry Controversy ban on muslims: मुस्लिम तरुण गरब्यात प्रवेश घेताना आढळला, तर त्याला पोलिसांच्या स्वाधीन करा. नाहीतर आम्ही स्वतः त्याला पोलिसांच्या ताब्यात देऊ.
Vishwa Hindu Parishad on Garba
Vishwa Hindu Parishad on GarbaSarkarnama
Published on
Updated on

शारदीय नवरात्रोत्सव सोमवार, २२ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. या उत्सवासाठी देशभर जोरदार तयारी सुरु आहे. देवीची आरास आणि गरब्याचा जल्लोषाची तयारी सुरू आहे. नवरात्रोत्सवा आधीच विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांनी गरब्याच्या आयोजकांना एक सूचना दिली आहे. याची चर्चा सध्या सुरु आहे.

गरब्यात फक्त हिंदू सहभागी होऊ शकतात; मुस्लिमांना प्रवेश देऊ नये, असे स्पष्ट सूचना विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्याकडून आयोजकांना देण्यात आल्या आहेत. गरब्यासाठी प्रवेश देताना आधार कार्ड तपासणे अनिवार्य असल्याचंही सूचनेत म्हटलं आहे. जर मुस्लिम तरुण गरब्यात सामील झाले तर त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्याची सूचना दिली गेली आहे, असे यात नमूद केले आहे.

Vishwa Hindu Parishad on Garba
Maharashtra Assembly: विरोधी पक्षनेता कोण होणार? आकड्यांची कोंडी, दावेदारांची गर्दी

गरबा सोहळ्यावर बजरंग दल आणि विहिंप यांच्या कार्यकर्त्यांची लक्ष ठेवून असणार आहे, अशी माहिती समोर येत आहे. याबाबत लवकरच पत्रकार परिषद घेऊन पोलिसांना अधिकृत सूचना आणि विनंती पत्र दिले जाणार असल्याचेही समजते.

नागपुरमध्ये आयोजित गरबा उत्सवावर विश्व हिंदू परिषद (विहिंप) आणि बजरंग दल यांच्याकडून ठळक सूचना देण्यात आल्या आहेत. काही मुस्लिम तरुण गरबा उत्सवात लपून प्रवेश करून सहभागी होतात, असा आरोप विहिंपने केला आहे. उत्सवात फक्त हिंदू सहभागी होऊ शकतात, मुस्लिम तरुणांना प्रवेश देऊ नये, असे सांगण्यात आले आहे.

Vishwa Hindu Parishad on Garba
MNS Kolhapur: मनसेच्या कोल्हापूरच्या जिल्हाप्रमुखाची पावले भाजपकडे? अटीशर्तीमुळे निर्णय लांबणीवर

नवरात्र उत्सवातील दांडिया गरबा हा फक्त हिंदूंसाठीच असल्याचा दावा करून आधार कार्ड तपासून त्यासाठी प्रवेश देण्यात यावा अशी मागणी, विश्व हिंदू परिषदेने केली आहे. त्यामुळे गरबा दांडिया संयोजकांपासून पोलिसांपुढेही डोकेदुखी उभी राहण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com