Lokmanya Tilak Award : Sarkarnama
पुणे

Lokmanya Tilak Award : बदलेल्या सत्तानाट्याच्या पार्श्वभूमीवर मोदी-फडणवीस-शिंदे-शरद-पवार-अजित पवार एकाच मंचावर..

सरकारनामा ब्यूरो

Pune News : पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi) यांना 'लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार' जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण येत्या एक ऑगस्ट रोजी होणार आहे. या पुरस्कार प्रदान कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारही उपस्थित राहणार आहेत. यामुळे राष्ट्रवादी काँग्रसच्या फुटीनंतर आणि महाराष्ट्रातील बदललेल्या सत्तानाट्याच्या पार्श्वभूमीवर हे सर्व नेते एकाच मंचावर येणार आहेत.

दरम्यान या पुरस्कार सोहळ्याआधी यावरून हा वाद उफाळून आला आहे. हा पुरस्कार नरेंद्र मोदींना जाहीर करण्यावर काँग्रेसनं आक्षेप नोंदवला आहे. पुणे शहर काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी यावर जोरदार आक्षेप घेतला आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना पत्र लिहत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी हा विरोध दर्शवला. (Latest Marathi News)

काय आहे वाद?

टिळक स्मारक या संस्थेकडून हा पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो. यंदा या पुरस्काराचा ४१ वे वर्ष आहे. यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र या संस्थेच्या वतीने ज्यांनी पत्रकार परिषद घेतली ते रोहित टिळक काँग्रेसचे पदाधिकारी आणि नेते आहेत. यावर आता काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी आक्षेप घेतला आहे. या आक्षेपसंदर्भातलं पत्र त्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे पाठवलेले आहे.

कधी दिला जाणार पुरस्कार?

१ ऑगस्ट लोकमान्य टिळक यांची पुण्यस्थिती असते. या दिवशी दरवर्षी हा पुरस्कार जाहीर करण्यात येतो. यंदाचा पुरस्कार देखील १ ऑगस्ट रोजी पंतप्रधान मोदींना प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्कार सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती असणार आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनाही या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे. यामुळे राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार हे एकाच मंचावर येण्याची शक्यता आहे. (Lokmanya Tilak Award)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT