Pune News : महापालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवार निश्चित करण्यासाठी बैठकांचे सत्र सुरू केले आहे. निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच बहुतांश पक्षांनी इच्छुकांचे उमेदवारी अर्ज मागवले होते तसेच इच्छुकांच्या मुलाखतीही पूर्ण केल्या आहेत.
उमेदवारी निश्चितीसाठी वरिष्ठ पातळीवरच्या बैठकांना सुरुवात झाली असून या बैठकांमध्ये अंतिम याद्या निश्चित करण्याचे काम सुरू झाले आहे. इलेक्टिव्ह मेरिटच्या आधारावर ही यादी फायनल केली जात आहे. आता या वरिष्ठांच्या निर्णयाकडे सर्व इच्छुकांच्या नजरा लागल्या आहेत. मात्र त्यापूर्वी भावी नगरसेवकांनी जोरदार लॉबिंग सुरू केली आहे.
विशेष म्हणजे भाजपकडून 16 नेत्यांची मुलं यंदा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी सज्ज झाल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे या 16 पैकी 12 जण हे मूळ भाजपचेच आहेत. त्यामुळे भाजपवर देखील घराणेशाहीचा आरोप करण्यात येत आहे.
पुण्यातील 41 प्रभागांमधून एकूण 165 नगरसेवक निवडून येणार आहेत, पण यातही नेत्यांच्या आवडत्या व्यक्तींनाच तिकीट मिळण्याची शक्यता जास्त असल्याने, सामान्य कार्यकर्त्यांना फक्त प्रचाराची धुरा सांभाळण्याचंच काम करावं लागतं का? असा रोषपूर्ण प्रश्न सर्वच राजकीय पक्षांतील कार्यकर्ते उपस्थित करीत आहेत.
- कुणाल टिळक दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पुत्र
- स्वरदा बापट दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या सून
-राघवेंद्र मानकर माजी उपमहापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष दीपक मानकर यांचा मुलगा
- रुपेश मोरे माजी नगरसेवक आणि शिवसेना नेते वसंत मोरे यांचा मुलगा
-करण मिसाळ आमदार आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचा मुलगा
- हर्षवर्धन मानकर माजी उपमहापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष दीपक मानकर यांचा मुलगा
- सुप्रिया कांबळे विद्यमान आमदार सुनील कांबळे यांची कन्या
- प्रणव धंगेकर शिवसेना महानगरप्रमुख आणि माजी आमदार रविंद्र धंगेकर यांचा मुलगा
- सुरेंद्र पठारे वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे विद्यमान आमदार बापू पठारे यांचा मुलगा
- प्रियंका शेंडगे माजी उपमहापौर सरस्वती शेंडगे यांच्या कन्या
- हेमंत बागुल माजी उपमहापौर,माजी नगरसेवक राहिलेल्या आबा बागुल यांचा मुलगा
- चेतन टिळेकर आमदार भाजपचे विधान परिषदेचे योगेश टिळेकर यांचा भाऊ
- ईशान तुपे राष्ट्रवादी काँग्रेसचे हडपसर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार चेतन तुपे यांचा मुलगा
- मयुरेश वांजळे मनसेचे दिवंगत माजी आमदार रमेश वांजळे यांचे पुत्र
- महेश पुंडे भाजप नेत्या आणि माजी नगरसेविका कालींदा पुंडे यांचा मुलगा
- गिरीराज सावंत माजी मंत्री आणि आमदार तानाजी सावंत यांचा मुलगा
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.