Avinash Bagwe defeated after recount Sarkarnama
पुणे

Avinash Bagwe: अविनाश बागवेंना मोठा धक्का! अटीतटीच्या लढाईत अवघ्या ४५ मतांनी पराभूत; फेरमोजणी नंतर...

Avinash Bagwe loses by 45 votes: पुणे महानगरपालिकेत अनेक प्रभागांमध्ये धक्कादायक निकाल समोर आले आहेत.

सरकारनामा ब्युरो

Avinash Bagwe Loses by 45 Votes After Recount in Close Fight: पुणे महानगरपालिकेत अनेक प्रभागांमध्ये धक्कादायक निकाल समोर आले आहेत. यामध्ये काशेवाडी-डायस प्लॉट या प्रभाग क्रमांक २२ मध्ये सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये काँग्रेसचं आख्ख पॅनेल आघाडीवर होतं.

पण सहाव्या फेरी अखेर धक्कादायक निकाल समोर आला आहे. यामध्ये विद्यमान नगरसेवक अविनाश बागवे हे अत्यंत घासून झालेल्या लढतीत केवळ ४५ मतांनी पराभूत झाले आहेत. या ठिकाणी पूर्ण विजयाची खात्री असल्यानं त्यांनी फेरमतमोजणीची मागणी केली. पण यातही त्यांचा पराभव झाला असल्याचं घोषित करण्यात आलं.

सकाळी पावणे बारा वाजेपर्यंत दुसऱ्या फेरीवेळी पुण्यातील काशेवाडी-डायस प्लॉट या एकमेव प्रभागात काँग्रेसची आघाडी होती. यामध्ये 'अ' गटातून इंदिरा बागवे या ६१६९ मतांनी आघाडीवर होते. 'ब' गटातून रफिक शेख ६२५०, 'क' गटातून दिलशाद शेख ५,३३७ मतांनी आघाडीवर होते. तर 'ड' गटातून अविनाश बागवे हे ५१९९ मतांनी आघाडीवर होते. पण त्यानंतर पुढच्या फेऱ्यांमध्ये वेगानं आकडे बदलले आणि काँग्रेस पूर्णपणे पिछाडीवर गेली.

दुपारी एक ते दीड वाजण्याच्या सुमारास या प्रभागात सहाव्या फेरीनंतर चित्र पूर्णपणे पालटलं. यावेळी 'अ' गटातून भाजपच्या मृणाल कांबळे १४,०७९ विजयी झाल्या तर 'ब' गटातून काँग्रेसचे रफिक शेख १४,०४३ मतांनी विजय झाला तर 'क' गटात अर्चाना पाटील १५,७८८ मतांनी निवडून आल्या आहेत. तर 'ड' गटातून अविनाश बागवेंचा पराभव करुन भाजपचे विवेक यादव हे १२,४१० मतांनी विजयी झाले आहेत.

दरम्यान, अगदीच ४५ मतांनी पराभव झाल्यानं अविनाश बागवे यांनी फेरमतमोजणीची मागणी केली. पण फेरमतमोजणीनंतरही चमत्कार काही दिसला नाही उलट ६२ मतांच्या फरकानं बागवेंचा पराभव घोषित करण्यात आला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT