PMC News: कोरोना महामारीच्या काळामध्ये पुण्यात नागरिकांना आयसीयू बेड मिळत नव्हते अशा काळात शासकीय रुग्णालय आणि खाजगी रुग्णालयामध्ये समन्वय साधून आयसीयू बेडची संख्या वाढवणे, साध्या बेडची संख्या वाढवण्यासाठी काम केलेल्या आयएएस अधिकारी पवनीत कौर यांची आता पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. सध्याचे अतिरिक्त आयुक्त एम. जे. प्रदीप चंद्रन यांची सात महिन्यामध्ये राज्य सरकारने बदली केली आहे. सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव सुभाष उमराणीकर यांनी हे आदेश काढले आहेत.
पवनीत कौर यांनी यापूर्वी छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हापरिषदेच्या मुख्य अधिकारी, आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या आयुक्त, अमरावतीच्या जिल्हाधिकारी, भूवैज्ञानिक सर्वेक्षण व विकास संस्थेच्या संचालकपदी काम केले आहे. त्या २०१४ च्या बॅचच्या अधिकारी आहेत. त्यानंतर त्या यशदामध्ये उपसंचालक यापदावर कार्यरत होत्या. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांची पुणे महापालिकेत अतिरिक्त आयुक्तपदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
तर दुसरीकडं प्रदीप चंद्रन यांची मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाचे (स्मार्ट) प्रकल्प अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. बदली करताना या पदाचा दर्जा वाढविण्यात आला आहे. मार्च महिन्यात पुणे महापालिकेत अतिरिक्त आयुक्तपदी त्यांची बदली करण्यात आली होती. हा कार्यभार स्वीकारून त्यांनी अवघे सात महिने झाले होते. पण त्यांचा कार्यकाल पूर्ण होण्याआधीच त्यांना महापालिकेतून हटविण्यात आल्यानं याची उलटसुलट चर्चा सुरू आहे.
कौर या आता पुणे महापालिकेत अतिरिक्त आयुक्त पदाची जबाबदारी स्वीकारणार आहेत. त्यांना अतिरिक्त आयुक्त जनरल या पदाचा कार्यभार मिळणार आहे. यामध्ये महापालिकेच्या आरोग्य विभागाची देखील जबाबदारी त्यांच्याकडे असणार आहे. त्यामुळे भविष्यात पुणे महापालिकेची आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी त्यांना संधी उपलब्ध झालेली.
कौर या पुण्यात आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या प्रमुख म्हणून काम करत असताना कोरोना महामारीने थैमान घातले होते. त्याच काळात कौर यांच्याकडे पुणे जिल्ह्यात शासकीय व खासगी रुग्णालयांसोबत समन्वय ठेवण्यासाठी नोडल ऑफिसर म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. याकाळात कोरोनाच्या रुग्णांना खासगी रुग्णालयात जास्तीत जास्त खाटा उपलब्ध करून देणे, ऑक्सिजन सुविधा पुरविणे, आयसीयू खाटांची संख्या वाढविणे यासाठी त्यांनी काम केले आहे. त्यामुळे रुग्णांना वेळीच योग्य उपचार मिळण्यासाठी मदत झाली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.