PMC Property Tax: पुणे महापालिकेची निवडणूक आगामी काही दिवसांमध्ये होणार आहे. त्यापूर्वी नागरिकांना दिलासा देणाऱ्या योजना महापालिकेकडून राबवण्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी मिळकत कर थकबाकीदारांसाठी महापालिकेने अभय योजना जाहीर केली होती. एक प्रकारे निवडणुकीपूर्वी मतदारांना खूश करण्याचाच हा प्रकार होता. तशा स्वरुपाचा आरोपही या योजनेबाबत करण्यात आला होता.
यानंतर आता महापालिकेमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या 32 गावांसाठी महापालिका निवडणुकीपूर्वी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य शासनाच्या नगर विकास विभागाकडून मिळकत कर आकारणीबाबत हा निर्णय घेण्यात आला आहे.
पुणे महापालिकेत नव्यानं समाविष्ट ३२ गावांमधील समस्यांचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी दृकश्राव्य माध्यमातून पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. या बैठकीत महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांमधील पाणीपुरवठा, पथदिवे, कचरा या स्वरूपाचे प्रश्न तातडीने सोडवा अशा सूचना त्यांनी प्रशासनाला केल्या होत्या. गावांच्या विकासकामांसाठी निधी नसल्याने कामांवर परिणाम होतो. त्यामुळे समाविष्ट गावांतील मिळकतकरावर राज्याचा नगर विकास विभाग काम करत आहे. येत्या दोन दिवसांत त्यांच्याकडून मिळकतकराबाबतचा निर्णय महापालिकेला कळविला जाईल, असे उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी सांगितले होते.
त्यानंतर आज बुधवारी नगर विकास विभागाकडून महापालिकेला नवे आदेश देण्यात आले आहेत. त्यामध्ये पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट ३२ गावांतील मालमत्ता कर हा ग्रामपंचायतीकडून आकारण्यात येणाऱ्या कराच्या दुप्पट दराने आकारण्यात यावा असा आदेश आहे. पण या गावांचा मालमत्ता कर आधीच्या ग्रामपंचायत कराच्या दुप्पटीपेक्षा जास्त होणार नाही, अशा पद्धतीने या कराचं पुनर्विलोकन होईपर्यंत मालमत्ता कर वसूल करण्यास स्थगिती देण्यात आली आहे.
शासनाच्या या निर्णयामुळं या ३२ गावांमधील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पण महापालिका निवडणुकीनंतर ही पुनर्विलोकन प्रक्रिया पूर्ण होऊन नियमितपणे ग्रामपंचायत कराच्या दुप्पट दरानं हा कर लागू होण्याची शक्यता आहे. पण तोपर्यंत तरी नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.