Ajit Pawar sarkarnama
पुणे

Ajit Pawar News : 'त्यांची मस्ती कंट्रोलमध्ये आणावी लागेल'; उपमुख्यमंत्री अजित पवारांचा इशारा

Nilesh Ghaiwal Reels : शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती यापुढील काळात बिघडेल, असे कोणतेही वर्तन करणार नाही, अशी हमी या गुन्हेगारांकडून घेत पोलिसांनी त्यांना समज दिली होती.

Chaitanya Machale

Pune News: अमितेश कुमार यांनी पुणे पोलिस आयुक्त पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर गुन्हेगारांची 'परेड' घेतली. त्यांना आवश्यक त्या सूचना केल्या. मात्र, परेडनंतर अवघ्या काही तासांतच काही गुन्हेगारांनी सोशल मीडियावर रील्स टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पोलिस आयुक्तांच्या सूचनांकडे गुन्हेगार दुर्लक्ष करत असल्याचे चित्र निर्माण झाले. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर भाष्य केले आहे.

'पुण्याच्या पोलिस आयुक्तांनी गुन्हेगारांना बोलावून त्यांना समज दिल्याच्या बातम्या न्यूज चॅनल आणि वर्तमानपत्रात आपण वाचल्या आहेत. त्यानंतरदेखील गुन्हेगार याकडे दुर्लक्ष करत असतील, तर गुंडांची मस्ती ही पोलिसी खाक्या दाखवून कंट्रोलमध्ये आणावी लागेल,' असा इशाराच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी गुन्हेगारांना दिला आहे.

पुण्याचे पोलिस आयुक्त सध्या नाशिक येथे गेलेले आहेत. तेथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा कार्यक्रम आहे. ग्रामीणचे नव्याने चार्ज घेतलेले पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी आपली भेट घेतली होती. या दोघांना बोलावून सर्वसामान्य नागरिकांना गुन्हेगारांचा कोणताही त्रास होणार नाही, याकडे लक्ष देण्याच्या सूचना करणार आहे, असेदेखील अजित पवार यांनी सांगितले.

गुन्हेगारांना पोलिसांचा 'दम'

पोलिसांनी गुन्हेगारांच्या घेतलेल्या 'परेड'मध्ये शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती यापुढील काळात बिघडेल, असे कोणतेही वर्तन करणार नाही. तसेच त्यामध्ये आपला सहभाग राहणार नाही, अशी हमी या गुन्हेगारांकडून घेत समज दिली होती. पुढील काळात तुमची कोणतीही चूक खपवून घेतली जाणार नाही, असा दमच पोलिसांनी गुन्हेगारांना भरला होता.

(Edited By Roshan More)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT