Pimpri-Chinchwad  Sarkarnama
पुणे

Pimpri : राहुल गांधींवरून पिंपरीत राजकारण तापलं; भाजप अन् काँग्रेस आमने-सामने

BJP : पिंपरीत भाजपने राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केले.

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : राहुल गांधींचे खासदारपद रद्द केल्याच्या निषेधार्थ काँग्रेसने आज सायंकाळी पिंपरीत केंद्र सरकार तथा भाजपविरोधात आणि राहुल गांधींच्या समर्थनार्थ आंदोलन केले. तर, मोदी या आडनावावरून अपमानास्पद टिप्पणी करताना तेली, ओबीसी समाजाचा अपमान केल्याबद्दल भाजपने पिंपरीत राहुल गांधींचा निषेध केला.

राहुल गांधी हे आपल्या घराण्यामुळे आलेल्या राजेशाही मानसिकतेतून बाहेर पडलेले नाहीत असेच त्यांच्या वक्तव्यावरून दिसते, अशी टीका भाजपने यावेळी केली. तर, राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करणाऱ्या केंद्र सरकारचे काऊंटडाऊन सुरु झाल्याचा हल्लाबोल काँग्रेसने केला.

भाजपने पक्षाच्या पिंपरीतील शहर पक्ष कार्यालयाबाहेर राहुल गांधींविरोधात आंदोलन केले. त्यात प्रदेश सचिव अमित गोरखे, शहर संघटन सरचिटणीस अमोल थोरात, सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, विजय फुगे, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके आदींनी भाग घेतला. यावेळी राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले.

राहुल गांधी यांचे खासदार पद रद्द करणे म्हणजे लोकशाहीचा काळा दिवस असून हुकूमशाहीकडे वाटचाल आहे, अशी टीका काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष डॉ.कैलास कदम यांनी केली.

संसदेत केंद्र सरकारला विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देण्याऐवजी बेकायदेशीररित्या राहुल गांधींचे खासदारपद त्यांनी संपुष्टात आणले. त्यातून या भांडवलदार धार्जिण्या सरकारचे आता काउंटडाऊन सुरू झाले आहे, असं ते म्हणाले.

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याच्या निषेधार्थ पिंपरीत त्यांच्या नेतृत्वात निषेध आंदोलन झाले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, ज्येष्ठ नेते गौतम अरकडे, वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, महिला शहराध्यक्ष सायली नढे, चिंचवड ब्लॉक अध्यक्ष माऊली मलशेट्टी, युवक शहराध्यक्ष कौस्तुभ नवले, विजय ओव्हाळ यांच्यासह आदी सामील झाले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT