Uddhav Thackeray : मालेगावच्या सभेसाठी उद्धव ठाकरेंचे उर्दू भाषेत झळकले बॅनर

Nashik : मालेगावमध्ये उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार असल्यामुळे राजकीय वातावरण तापलं
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Shivsena News : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ उद्या (दि.26 मार्च) नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात धडाडणार आहे. मालेगावमध्ये उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार असल्यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे.

शिवसेनेत फुट पडल्यानंतर उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला. त्यानंतर आता ठाकरेंनी पुन्हा एकदा पक्ष बांधणीसाठी सुरूवात केली आहे. या पार्श्वभूमीवरच उद्धव ठाकरे यांची खेड नंतर आता मालेगावमध्ये जाहीर सभा होणार आहे.

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : योगेश कदमांनंतर मोर्चा दादा भुसेंकडे; हिरेंना ताकद अन् ठाकरेंचे मालेगावात शक्तीप्रदर्शन

मात्र, या सभेआधीच उद्धव ठाकरे यांचे उर्दू भाषेत बॅनर झळकले आहेत. त्यामुळे या बॅनरची चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरीतील खेड येथे शिवसेनेतील बंडानंतर पहिली जाहीर सभा घेतली.

त्यानंतर आता ठाकरे हे मालेगावात दुसरी जाहीर सभा घेत आहेत. मंत्री दादा भुसे यांच्या मतदारसंघात ही सभा होणार असल्यामुळे उद्धव ठाकरे हे काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Uddhav Thackeray
Rahul Gandhi News : राहुल गांधींनी देशाची माफी मागावी अन् प्रायश्चित्त घ्यावं !

दरम्यान, राज ठाकरे यांची नुकतीच शिवतीर्थावर गुढीपाडव्याच्या दिवशी सभा झाली. या सभेत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला. त्यानंतर ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात रोजच आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

तसेच राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्याने देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यामुळे या सर्व घडामोडींवर ठाकरे काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.