Prakash Ambedkar and Devendra Fadnavis Sarkarnama
पुणे

Prakash Ambedkar : वाल्मिक कराड प्रकरणी सरकारवर दबाव पण..., प्रकाश आंबेडकरांनी CM फडणवीसांना केलं 'हे' मोठं आवाहन

Prakash Ambedkar On Santosh Deshmukh Murder Case : वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी आज (बुधवारी) कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन केलं. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राज्यात चर्चेत असलेल्या बीड आणि परभणीतील हत्या प्रकरणावर भाष्य केलं.

Jagdish Patil

Pune News, 01 Jan : वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी आज (बुधवारी) कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन केलं. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राज्यात चर्चेत असलेल्या बीड हत्या प्रकरणावर भाष्य केलं.

तर संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्ये संदर्भात वाल्मिक कराड याच्यावरील कारवाईबाबत राज्य सरकारवर दबाव आहे. मात्र या दबावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बळी नये, असं आवाहन केलं आहे. शिवाय यावेळी त्यांनी पोलिसांच्या कारवाईवर नाराजी व्यक्त करत वाल्मिक कराड प्रकरणात पोलिस खात्याला अपयश आल्याचंही म्हटलं आहे.

आंबेडकर म्हणाले, संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिस खात्याचं अपयश दिसून आलं आहे. पोलिसांना वाल्मिक कराड कुठे होता, हे माहिती नव्हतं, याचं आश्चर्य वाटतं गुप्तचर यंत्रणांनी आपलं अपयश वारंवार समोर आणू नये. बीडमधील (Beed) हत्या प्रकरणाच्या लढ्याला विशिष्ट रंग दिला जात आहे, असंही ते यावेळी म्हणाले.

तसंच यावेळी त्यांनी सर्व जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत कोरेगाव भीमा येथे अभिवादन करण्यासाठी आजही जनता येत आहे, ही गोष्ट चांगली असल्याचं म्हटलं. शिवाय समजातील विषमता अणि अमानुष वागणुकीचा लढा फिजिकल संपला असला तरी तो मानसिकरित्या सुरु आहे.

परभणी आणि बीडची घटना घडली, मानसिक बदल न झाल्यामुळे अशा घटना घडतात. मानवतावादी लढा ज्यांनी उभा केला त्यांनी परत पुढं यावं म्हणजे हा संघर्ष संपेल. केंद्र आणि राज्य सरकार हे भाजपचे आहे. सगळ्यांनी समोर येऊन प्रयत्न केले पाहिजेत, असंही आंबेडकर यावेळी म्हणाले.

दरम्यान, कोरेगाव भीमा येथे आज 207 वा शौर्यदिन साजरा केला जात आहे. यासाठी कोरेगाव भीमा येथे जोरदार तयारी करण्यात आली असून या ठिकाणी लाखो अनुयायी अभिवादन करण्यासाठी येणार आहेत. त्यानिमित्ताने विजयस्तंभाला आकर्षक फुलांची रोषणाई करण्यात आली आहे. विजय स्तंभाला यंदा संविधानाच्या प्रतिकृतीची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT