Walmik Karad Hearing : केज कोर्टातील 'या' मोठ्या ट्विस्टनंतर अखेर वाल्मिक कराडला 15 दिवसांची पोलिस कोठडी

Kej Court Hearing On Walmik Karad 2 Crore Ransom Case : वाल्मिक कराड याला न्यायालयात आणण्यापूर्वी बीड पोलिसांनी न्यायालयाच्या आवारात बंदोबस्त वाढवला होता. वाल्मिक कराड याचे समर्थक आणि विरोधकांनी केज न्यायालयाच्या आवारात गर्दी केली होती. ही गर्दी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करून पांगवली.
Walmik Karad
Walmik KaradSarkarnama
Published on
Updated on

Beed News : गेल्या 22 दिवसांपासून ज्यांच्याभोवती बीड खंडणी आणि मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणाचा तपास फिरत होता, ते वाल्मिक कराड (Walmik Karad) अखेर शरण आले आहेत. मंगळवारी दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास त्याला पुण्यातील सीआयडीच्या कार्यालयात सरेंडर झाले. यानंतर त्याची काही तास चौकशी केल्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यासाठी बीडला रवाना करण्यात आले. मात्र, आता केजच्या न्यायालयातून मोठी अपडेट समोर आली आहे.

पुण्याहून वाल्मिक कराडला घेऊन सीआयडी पथक मंगळवारी रात्री उशिरा साडेनऊ वाजण्या्च्या सुमारास केज शहरात दाखल झालं. केजच्या सरकारी रुग्णालयात त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर केज पोलीस ठाण्यात सीआयडी पथकानं दाखल होत तांत्रिक गोष्टींची पूर्ण केल्या. ही सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर कराड यांना केज कोर्टात (Court) हजर करण्यात येणार होतं.पण त्यापूर्वीच न्यायालयात मोठ्या नाट्यमय घडामोडी घडल्याची माहिती समोर आली आहे.

वाल्मिक कराड याला खंडणीच्या गुन्ह्यात न्यायालयाने 15 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. 'सीआयडी'च्या पथकाने त्याला बीड पोलिसांकडे वर्ग केले. वाल्मिक कराड याला पोलिसांनी केज जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयात हजर केले. तत्पूर्वी त्याची केज रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली.त्यानंतर वाल्मिक कराड याला केज पोलिस ठाण्यात आणण्यात आले.

Walmik Karad
Walmik Karad : कराडच्या शरणागतीवर ठाकरेंच्या विश्वासू शिलेदारांची दोन दिशेला तोंडे; ‘एकाकडून अभिनंदन; दुसऱ्याकडून ताशेरे’

वाल्मिक कराड याला न्यायालयात आणण्यापूर्वी बीड पोलिसांनी न्यायालयाच्या आवारात बंदोबस्त वाढवला होता. वाल्मिक कराड याचे समर्थक आणि विरोधकांनी केज न्यायालयाच्या आवारात गर्दी केली होती. ही गर्दी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करून पांगवली.

पोलिसांनी वाल्मिक कराड याला खंडणीच्या गुन्ह्यात न्यायालयासमोर हजर केले होते. वकील हरिभाऊ गुठे आणि वकील अशोक कवडे यांनी वाल्मिक कराड याच्यातर्फे, तर सीआयडीकडून जे.बी.शिंदे यांनी युक्तिवाद केला.यानंतर न्यायालयाने कराडला 15 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

Walmik Karad
Uddhav Thackeray: ठाकरेंना पुण्यात मोठा धक्का बसणार? फायरब्रँड नेत्यासह माजी आमदार,नगरसेवक साथ सोडणार,कमळ हाती घेणार?

मोठा ट्विस्ट...

आरोपी वाल्मिक कराड याच्या रिमांडबाबत केज न्यायालयात रात्री उशिरा सुनावणी होत आहे.मात्र,या सुनावणीसाठी न्यायालयासमोर कराडची बाजू मांडण्यासाठी दोन-दोन वकील उपस्थित होते,तर सीआयडीकडून सरकारी वकील एस.एस.देशपांडे हे युक्तिवाद करणार होते.पण सुनावणीला काही अवधी शिल्लक राहिला असतानाच या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला.

सरकारी वकील एस.एस.देशपांडे यांनी न्यायालयाला एक पत्र दिलं. त्यात त्यांनी वैयेक्तिक कारणास्तव आपण ही केस लढवणार नसल्याचं नमूद करत अन्य सरकारी वकील नेमण्यात यावा अशी विनंती करण्यात आली होती.त्यानंतर न्यायालयाकडून जे बी शिंदे यांची या प्रकरणात सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Walmik Karad
Walmik Karad Surrender : शरण येण्यापूर्वी तीन दिवस वाल्मिक कराड कुठे होता? संभाजीराजेंनी केले मोठे गौप्यस्फोट

याचदरम्यान,बीड खंडणी प्रकरणासह सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराडच्या बाजू वकील हरिभाऊ गुठे आणि अशोक कवडे हे मांडणार आहेत. ते केज न्यायालयात रात्री दहा वाजल्यापासून उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com