Prakash Ambedkar News  Sarkarnama
पुणे

Prakash Ambedkar : 'वंचित'ला इंडिया आघाडीत घेण्यापासून कोण रोखत आहे? प्रकाश आंबेडकर आक्रमक

Mahavikas Aghadi : युतीसाठीचा पत्रव्यवहार करूनही 'वंचित'ला इंडिया आघाडीत आणि महाविकास आघाडीत सहभागी करून घेण्यात आलेले नाही.

Roshan More

Pune : वंचित बहुजन आघाडीचा इंडिया तसेच महाविकास आघाडीत समावेश करायचा की नाही, याचा निर्णय अजूनही झालेला नाही. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथाला यांनी 'वंचित'च्या समावेशाबाबत निर्णय निवडणूक जाहीर झाल्यानंतर घेऊ, तसेच वंचितच्या समावेशाबद्दल उद्धव ठाकरे आणि शरद पवारांशी चर्चा करीत आहोत, असे सांगितले. त्याला वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करीत प्रत्युत्तर दिले .

वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला (Ramesh Chennithala ) यांना वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीत आणि महाविकास आघाडीत सहभागी करून घेण्यापासून कोण रोखत आहे, असा सवाल ट्विटरच्या माध्यमातून केला आहे. काँग्रेसने शिवसेना (Shivsena उद्धव ठाकरे) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) या दोघांनाही वंचितसोबत युती करण्यासाठी अधिकारपत्र दिले आहे का? असा टोलादेखील लगावला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सतत युतीसाठीचा पत्रव्यवहार करुनही 'वंचित'ला इंडिया आघाडीत आणि महाविकास आघाडीत सहभागी करून घेण्यात आलेले नाही. इंडिया आघाडीचे आणि महाविकास आघाडीचे नेते माध्यमांसमोर मात्र वंचित आमच्यासोबत असल्याचे म्हणत असतात. परंतु अद्यापही वंचित बहुजन आघाडीचा इंडिया आघाडीत आणि महाविकास आघाडीत सहभाग झालेला नाहीय.

प्रकाश आंबेडकर आक्रमक

महाविकास आघाडीतील नेते वंचितच्या समावेशाबाबत सकारात्मक वक्तव्य करीत आहेत. मात्र, अजूनही वंचितच्या समावेशाबाबत निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे प्रकाश आंबेडकर आपल्या जाहीर सभांमधून महाविकास आघाडीला थेट इशारा देत आहेत. नुकत्याच झालेल्या अमरावतीमधील सभेत कॉंग्रेस राष्ट्रवादी शिवसेना तुम्ही आम्हाला चर्चेत घेतलं तर, आम्ही तुमच्यासोबत आहोत. तुम्ही जसं इथल्या गरीब मराठ्याला वापरत आलात त्याच पद्धतीने जर 'वंचित'ला वापरायचा विचार केला तर, मोदीसोबत आम्ही तुम्हालाही गाडू एवढं लक्षात ठेवा, असे म्हटले.

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT