नाशिकची शिवसेना भक्कम आहे. सुधाकर बडगुजर यांच्यासारखे खंदे कार्यकर्ते आहेत. बडगुजर यांच्यावर कारवाई केली जाते. करा, मात्र ते एकनाथ शिंदेंसारखे गुडघे टेकणार नाहीत. आमच्यात टक्कर देण्याची ताकद आणि तयारी आहे, असे स्पष्ट करत शिवसेना नेते (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संजय राऊत यांनी नाशिकच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना बळ दिले.
ठाकरेंच्या शिवसेनेचे काल (23 जानेवारी) नाशिकमध्ये राज्यव्यापी अधिवेशन झाले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) जाहीर सभादेखील झाली. त्यापूर्वी सर्वजण काळाराम मंदिरात गेले. गोदाआरती केली. महानगरप्रमुख बडगुजर यांच्यासह विलास शिंदे, डी. जी. सूर्यवंशी यांच्यासह स्थानिक नेते, पदाधिकारी सर्वांनीच प्रचंड मेहनत घेतली, याकडे राऊत यांनी लक्ष वेधले.
दरम्यान, शिवसेना (ShivSena) फुटीनंतर नाशिकमध्ये (Nashik) ठाकरेंच्या शिवसेनेला फारसा फटका बसला नाही. पक्ष संघटना मजबूत आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांकडून महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांना टार्गेट करण्यात आले. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता हा पॅरोलवर असताना बडगुजर यांच्यासमवेत पार्टी झाल्याचा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला. याची चौकशी करण्यासाठी एसआयटी नियुक्त करण्यात आली.
याचदरम्यान नाशिक महापालिकेची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी एसीबीने (ACB) गुन्हा दाखल करून बडगुजरांच्या अडचणीत भर पाडली, असा आरोप ठाकरे गटाकडून सातत्याने केला जात आहे. बडगुजर यांच्या अंतरिम जामिनावर सध्या सुनावणी सुरू असून, कोर्ट आज सुनावणी करणार आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दरम्यान, आजच्या पत्रकारपरिषदेमध्ये संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर टीकेचे बाण सोडले. आमचे बडगुजर गुडघे टेकणार नाहीत, असे स्पष्ट करीत एक प्रकारे स्थानिक नेतृत्वाला बळ दिले. दरम्यान, बडगुजर यांच्या अंतरिम जामिनावर आज कोर्ट निर्णय देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अयोध्येत रामजन्मभूमीसाठी झालेल्या लढाईत आमचा सहभाग होता. मात्र, काळाराम मंदिराला महत्त्व नाही का? पंचवटीचे महत्त्व कमी आहे काय, असा सवाल उपस्थित करीत राऊतांनी अयोध्या दौऱ्यावरून होत असलेल्या टीकेला उत्तर दिले. काल आपण कारसेवकांना पाहिले असेल. ते काही स्टेशनपर्यंत गेले नव्हते, असा टोला देवेंद्र फडणवीस यांना लगावला. कारसेवक म्हणून नागपूर स्टेशनवरील फोटो देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ट्विट करून आपण अयोध्येला गेलो होतो, असा दावा केला होता. त्यावरून राऊतांनी हा टोला लगावला.
(Edited by Avinash Chandane)
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.