Uddhav Thackeray and Prakash Ambedkar  Sarkarnama
पुणे

Prakash Ambedkar News : उद्धव ठाकरे आमचे वकील तेच बाजू मांडतील ; आघाडीसंदर्भात आंबेडकरांनी टोलावला चेंडू

Uddhav Thackeray News : विरोधी पक्षांच्या 'इंडिया' आघाडीची बैठक मुंबईमध्ये ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबरला होत आहे.

सरकारनामा ब्यूरो

India Aghadi News: विरोधी पक्षांच्या 'इंडिया' आघाडीची बैठक मुंबईमध्ये ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबरला होत आहे. या बैठकीसाठी देशभरातील विरोधी पक्षांचे नेते मुंबईत येणार आहेत. मात्र, महाराष्ट्रातील वंचित बहुजन आघाडीला बैठकीचे निमंत्रण देण्यात आलेले नाही. यावर भाष्य करताना वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले, आम्ही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षासोबत आहोत. बैठकीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आमची बाजू मांडतील ते आमचे वकील असल्याचे सांगत त्यांनी चेंडू ठाकरेंच्या कोर्टात ढकलला.

आंबेडकर म्हणाले, आम्ही ठाकरे यांच्या सोबत आहोत. पण महाविकास आघाडीत नाही. 'इंडिया' आघाडीच्या बैठकीला आम्हाला का बोलावले नाही, याचे उत्तर काँग्रेस (Congress) देऊ शकले. आमच्या वतीने आजच्या बैठकीत उद्धव ठाकरे बोलतील ते आमचे वकील आहेत. त्यांनी आमच्या बाजूने बॅटिंग करणे गरजेचे आहे. आम्ही २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसला प्रस्ताव दिला होता. त्याच प्रमाणे आम्ही आताही तयार आहोत. मात्र, आम्हाला का बोलावले नाही, ते काँग्रेसचे नेते सांगू शकतील.

गेल्या काही महिन्यांपूर्वीच प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येत युतीची घोषणा केली होती. त्यानंतरही महाविकास आघाडीमध्ये वंचित सहभागी झाली नाही. इंडिया आघाडीच्या बैठकीचेही त्यांना निमंत्रण देण्यात आलेले नाही. दरम्यान, कोरेगाव भीमाच्या दंगलीबाबत चौकशी आयोगासमोर बुधवारी प्रकाश आंबेडकरांनी जबाब नोंदवला. यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी दंगलीच्या घटनाक्रम सांगत तत्कालीन गृहविभागाच्या चुकीवर बोट ठेवले. तसेच 'इंडिया' बैठकीबाबतही भाष्य केले.

आंबेडकर म्हणाले, "पोलीस अधिकऱ्यांनी दिलेली प्रतिज्ञापत्रे वाचली आहेत. यात अनेक बाबींची कमतरता जाणवते. त्यातील एक म्हणजे ग्रामपंचायतीने दिलेल्या ठरावांची कमतरता होती. व्हॉट्सअॅप वरील संभाषण, एकमेकांबद्दल बदललेली माहिती सादर केली. यावरून कोल्हापूर परिक्षेत्राकडे दोन दिवस आधी काय माहिती होती ? एसपी त्या दिवशी कुठे होते, त्यांच्यांकडे कुठली जबाबदारी होती ? याचा तपास व्हावा. अशी मागणीही आंबेडकरांनी केली.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT