Prakash Ambedkar On Koregaon Bhima : कोरेगाव भीमा दंगलीत संभाजी भिडेंचाच हात; प्रकाश आंबेडकरांचा दावा

Sambhaji Bhide is Behind Riot : "दंगलीबाबत माहिती असूनही पोलिसांनी वरिष्ठांना दिली नाही"
Sambhaji Bhide, Prakash Ambedkar
Sambhaji Bhide, Prakash AmbedkarSarkarnama

Pune Political News : 'कोरेगाव भीमा दंगल १ जानेवारी २०१८ रोजी सकाळी घडली होती. याबाबत माहिती असूनही पोलिसांच्या स्थानिक युनिट्सनी ती वरिष्ठांसह गृहविभागाला कळवली नाही', असा आरोप करत 'ही दंगल घडवण्यात संभाजी भिडेंची मोठी भूमिका होती' असा खळबळजनक दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. आंबेडकरांच्या या आरोपांमुळे तत्कालीन आणि सध्याच्या सत्तेतील सहभागी असणारी भाजप आक्रमक होण्याची शक्यता आहे. आंबेडकरांच्या या आरोपांना भाजप काय उत्तर देणार याकडे लक्ष आहे. (Latest Political News)

कोरेगाव भीमाच्या दंगलीबाबत चौकशी आयोगासमोर बुधवारी प्रकाश आंबेडकरांनी जबाब नोंदवला. यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी दंगलीच्या घटनाक्रम सांगत तत्कालीन गृहविभागाच्या चुकीवर बोट ठेवले. दंगलीबाबत मिळालेली माहिती लपवल्याचा पोलिसांवर आरोप करत दंगलीत संभांजी भिडेचा हात असल्याचेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

Sambhaji Bhide, Prakash Ambedkar
India Meeting in Mumbai: 'इंडिया' आघाडीत 'आप'ने टाकला मिठाचा खडा; केजरीवालांना पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित करण्याची केली मागणी

"पोलीस अधिकऱ्यांनी दिलेली प्रतिज्ञापत्रे वाचलेली आहेत. यात अनेक बाबींची कमतरता जाणवते. त्यातील एक म्हणजे ग्रामपंचायतीने दिलेले ठरावांची कमतरता होती. व्हॉट्सअॅप वरील संभाषण, एकमेकांबद्दल बदललेली माहिती सादर केली आहे. यावरून कोल्हापूर परिक्षेत्राकडे दोन दिवस आधी काय माहिती होती? 'एसपी' त्या दिवशी कुठे होते, त्यांच्यांकडे कुठली जबाबदारी होती? याचा तपास व्हावा. पोलिसांच्या सर्व युनिट्सकडे दंगलीबाबत माहिती होती, ती त्यांनी वर पोहचू दिली नाही. तसेच ही माहिती मुख्यमंत्री, गृहविभागाकडे कधी पोहचली? याचीही चौकशी व्हावी", अशी मागणीही (Prakash Ambedkar) प्रकाश आंबेडकरांनी केली.

Sambhaji Bhide, Prakash Ambedkar
Jaydatta Kshirsagar News: एक पुतण्या शरद पवारांसोबत तर दुसरा अजितदादांकडे; जयदत्त क्षीरसागर लागले कामाला..

माहिती मिळाली नसल्याने घटनास्थळापासून जवळ असणारे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात आले नसल्याचा दावाही आंबेडकरांनी केला. "दंगलीच्या दिवशी फडणवीस नगर जिल्ह्यात भीमा कोरेगावपासून ४० किलोमीटर अंतरावर होते. त्यांचे हेलिकॉप्टर सकाळी ११.३० ते ११.४० च्या दरम्यान उडाल्याची नोंद आहे. ही दंगल सकाळी झाली असली तरी याबाबत त्यांना माहिती मिळालीच नाही. तसे झाले असते तर त्यांनी पुण्यात येऊन आढावा घेतला असता. त्यामुळे हे प्रशासनाचे अपयश की राजकीय अपयश आहे हे तपासणे गरजेचे आहे", अशी भूमिकाही आंबेडकरांनी घेतली.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com