India Meeting in Mumbai: 'इंडिया' आघाडीत 'आप'ने टाकला मिठाचा खडा; केजरीवालांना पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित करण्याची केली मागणी

Arvind Kejriwal News: आम आदमी पक्षाने अरविंद केजरीवाल यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित करावा, अशी मागणी केली.
India Meeting in Mumbai
India Meeting in Mumbai Sarkarnama
Published on
Updated on

Delhi News: बलाढ्य भारतीय जनता पक्षाच्या ताब्यातील सत्ताकेंद्र खेचण्यासाठी विरोधी नेत्यांनी ‘एकी’ दाखवून,‘इंडिया’च्या बॅनर खाली एकत्र आले आहेत. मुंबईत दोन दिवस बैठकांचा सपाटा लावून विरोधी नेते मोदी-शाहांविरोधात लढण्याचा ‘रोड मॅप’ ठरवणार आहेत. मात्र, कसेबसे तरी जुने हेवेदावे बाजुला करून ‘इंडिया’च्या घटक पक्षांतील नेते बैठकीपुरते तरी एकत्र येत असतानाच ‘आप’ने पंतप्रधानपदाची अपेक्षा मांडून, बैठकीआधीच खळबळ उडवून दिली आहे.

आम आदमी पक्षाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित करावा, अशी मागणी केली आहे. त्यामुळे 'इंडिया' आघाडीच्या बैठकीत नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे आहेत. मुंबईतील 'इंडिया'च्या बैठकीत आगामी रणनीती ठरणार आहे. यामध्ये लोकसभेच्या जागांसदर्भात देखील चर्चा होणार आहे. पण त्या आधीच 'आप'च्या मागणीमुळे इंडिया आघाडीत धुसफूस वाढण्याची शक्यता आहे.

India Meeting in Mumbai
Sushma Andhare on Rakshabandhan : १२ महिने पाणउतारा करणाऱ्या सुषमा अंधारे शिंदेंच्या ४० आमदारांना बांधणार राखी

याआधी काँग्रेसने देखील राहुल गांधींना पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून घोषणा करण्याची मागणी केली होती. मात्र, त्यातच आता 'आप'च्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका कक्कड यांनी केजरीवाल यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित करण्याची मागणी केली. त्यामुळे 'इंडिया'च्या या बैठकीत नेमकी काय चर्चा होते, 'आप'च्या या मागणीवर आघाडीतील बाकीचे पक्ष काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

India Meeting in Mumbai
Farmer Protest In Mantralaya: अप्पर वर्धा प्रकल्प बाधितांना मुख्यमंत्र्यांचे मोठे आश्वासन; पंधरा दिवसांतच मार्गी लावणार प्रश्न

'इंडिया'च्या या बैठकीत आघाडीतील घटक पक्षात जागा वाटपसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे. याबरोबरच संयोजक ठरविण्याची शक्यता असतानाच आता या बैठकीत पंतप्रधानपदाचा उमेदवार राहुल गांधी की अरविंद केजरीवाल या वरून दोन्ही पक्षात वाद रंगण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे 'इंडिया'ची मुंबईतील बैठक वादळी होण्याची शक्यता आहे.

Edited By : Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com