Prakash Ambedkar News
Prakash Ambedkar News Sarkarnama
पुणे

Prakash Ambedkar News: ''पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांना उल्लू बनविणारा नेता अजित पवार..'' आंबेडकरांचं मोठं विधान

सरकारनामा ब्यूरो

Pune News: मागील काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात वेगवान हालचाली सुरु आहेत. याचदरम्यान, स्वराज्य संघटनेचे संभाजीराजे छत्रपती यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल पावणेदोन तास चर्चा झाली. या भेटीमुळे राज्याच्या राजकारणात नवीन समीकरणांची सुरुवात असल्याचं बोललं जात आहे. मात्र, या भेटीनंतर देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना उल्लू बनवणारा एकमेव नेता अजित पवार आहेत असं विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.

संभाजीराजे छत्रपती(SambhajiRaje Chhatrapati) यांनी सोमवारी( दि.१) पुण्यात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली.यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आंबेडकर म्हणाले, आजच्या महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेच्या केंद्रस्थानी अजित पवार असतील.देशांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना उल्लू बनवणारा एकमेव नेता अजित पवार आहेत.

विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ८ एप्रिलला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली असल्याचा दावा एका इंग्रजी वृत्तपत्राने केला आहे. अजित पवारांसह प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेही उपस्थित असल्याचं वृत्तपत्रात सांगितलं आहे. या बैठकीत संभाव्य मंत्रीपदाच्या खातेवाटपाबाबत चर्चा झाली आहे,” असेही वृत्तपत्रात सांगण्यात आलं आहे. अजित पवारांना भाजपाबरोबर जात मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे. त्यांना राष्ट्रवादीच्या ३५ ते ४० आमदारांचा पाठिंबा आहे. पण, शरद पवार भाजपाबरोबर जाण्यास इच्छुक नाहीत अशी माहिती समोर आलं होतं.

तसेच छत्रपती संभाजीराजे आणि माझी राजकीय विषयावर भेट झाली,मराठा आरक्षण निकाल लावायचा असेल तर सत्ता सत्ता हवी,आतापर्यत मराठा आरक्षणाबाबत फक्त राजकारण झालं,संघटन तयार केलं आहे त्यावर चर्चा झाली,आम्ही एकत्रित यायचं की नाही यावर ते सवंगडीशी चर्चा करून ठरवतील असंही प्रकाश आंबेडकरां(Prakash Ambedkar)नी यावेळी स्पष्ट केलं.

महाविकास आघाडीतलं 'वंचित'चं स्थान अद्यापही अधांतरीच!

काही महिन्यांपूर्वी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे गटाशी युती केली. यानंतर महाविकास आघाडीत वंचित हा घटक पक्ष असेल अशी चर्चा होती. पण आंबेडकरांच्या समावेशावरुन आघाडीत बरीच धूसफूस असल्याची चर्चा आहेत. यामुळे स्वत: उध्दव ठाकरेंनी प्रयत्न करुनही वंचितच्या आघाडीतील सहभागावर शिक्कामोर्तब झालेलं नाही. त्यामुळे सध्या फक्त ठाकरे गटाशीच युती आहे. याच पार्श्वभूमीवर आंबेडकरांकडून नवीन चाचपणी सुरु असल्याचंही सुरु आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT