Prasad Lad
Prasad Lad  Sarkarnama
पुणे

Prasad Lad : लाड यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह लिहणाऱ्या तरूणावर गुन्हा दाखल!

सरकारनामा ब्यूरो

Prasad Lad : भारतीय जनता पक्षाचे (BJP) उपाध्यक्ष व विधानपरिषेदेतील आमदार प्रसाद लाड आणि त्यांच्या मातोश्री यांच्याबद्दल समाजमाध्यमावर आक्षेपार्ह व वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी पुण्यातील भारती विद्यापीठ पोलिस स्थानकात एका तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

मयूर बोरोळे असे या तरूणाचे नाव आहे. मयूर बोरोळे या नावाने समाजमाध्यमावर बदनामकारक मजकूर लिहिण्यामुळे या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मयूर याने फेसबुकवर प्रसाद लाड यांच्या मातोश्री बद्दल खालच्या भाषेत लिखाण करून प्रसाद लाड यांची बदनामी केली होती.

“आम्ही काँग्रेसकर” या समाजमाध्यमातील ग्रुपवर मयूर बोरोळे या तरूणाने भाजप नेते प्रसाद लाड आणि त्यांच्या कुटुंबीयांविषयी आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केला होता. ही बाब मनीषा कदम यांच्या लक्षात आली. कदम यांनी या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. या तरूणावर माहिती-तंत्रज्ञान कायदा तसेच बदनामीकारक मजकूर प्रसारित केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक शिंदे अधिक तपास करत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT