Prashant Jagtap enters in Congress 
पुणे

Prashant Jagtap: प्रशांत जगताप काँग्रेसच्या पुण्यातील नेत्यांना ठरलेत अडचणीचे? नेमकं काय कारण काय? जाणून घ्या

Prashant Jagtap: जगताप यांचा काँग्रेस प्रवेश होताच पुण्यातील काही नेत्यांना ते अडचणीचे वाटू लागले आहेत. त्यामुळं उघडपणे जगताप यांच्याविरोधात काँग्रेसच्या नेत्यांनी भूमिका घेत आपल्या नाराजी मागचं कारणही स्पष्ट केलं आहे.

Amit Ujagare

Prashant Jagtap: शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष राहिलेले प्रशांत जगताप यांनी पक्षाचा राजीनामा देत आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. जगताप यांचा काँग्रेस प्रवेश होताच पुणे काँग्रेसमधील काही नेत्यांना ते अडचणीचे वाटू लागले आहेत. त्यामुळं उघडपणे जगताप यांच्याविरोधात काँग्रेसच्या नेत्यांनी भूमिका घेत त्यांच्या पक्ष प्रवेशाचं स्वागत केलं असलं तरी काहीसा विरोधाचाही सूर लावला आहे. आपल्या नाराजी मागचं कारणही या नेत्यांनी स्पष्ट केलं आहे.

प्रशांत जगताप यांच्या पक्ष प्रवेशावरुन पुणे काँग्रेसमध्ये नाराजी पसरली असून प्रदेश काँग्रेसकडून शहरातील काँग्रेस नेत्यांना विश्वासात घेतलं गेलं नाही, पक्ष प्रवेशाच्या प्रक्रिया डावलत प्रशांत जगताप यांना प्रवेश दिल्याचा आरोप काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केला आहे. त्याचबरोबर जगताप यांनी आतातायीपणे काँग्रेसमध्ये निर्णय घेऊ नये, अशा शब्दांत घरचा आहेरही त्यांनी दिला आहे.

अरविंद शिंदे नेमकं काय म्हणाले?

"प्रशांत जगताप यांचा स्वभाव मला माहिती आहे. मी २० वर्षे त्यांच्यासोबत काम केलं आहे. ज्या आतातायी पद्धतीनं त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं शहराध्यक्षपद सोडलं ते योग्य नाही. जर एखाद्या पक्षाला निर्णय सांगण्यात आपण अपयशी ठरलो तर लगेच एखादी टोकाची भूमिका घ्यायची नसते. आपल्यामध्ये कला असली पाहिजे आपल्या नेत्याचं मन वळवण्याची. जर ती आपल्यात नसेल आणि जर आपण आतातायीपणानं निर्णय घेतला आणि या स्वभावात जर तुमच्यामध्ये लवचिकता नसेल तर तुम्ही कोणत्याही पक्षात गेलात तर ते अडचणीचच होणार" अशा शब्दांत अरविंद शिंदे यांनी प्रशांत जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावर भूमिका मांडली आहे.

प्रशांत जगताप यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबईत शुक्रवारी प्रशांत जगताप यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश पार पडला. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्ष प्रवेश झाला, पण यावेळी पुण्यातील काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित नव्हते. काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगताप यांनी आपली भूमिकाही स्पष्ट केली. त्यांनी म्हटलं की, "ज्या काँग्रेस पक्षाला शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा आहे. तसंच गांधी आणि नेहरुंची विचारधारा आहे. त्या पक्षात मी सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील काळात पुण्यामध्ये काँग्रेसला पुन्हा एक नंबरला आणून महाराष्ट्रात आणि पुण्यात भाजपनं जे काही लुटलेलं आहे त्याला विरोध करणारा प्रमुख पक्ष म्हणून काँग्रेस कसा उभा राहील यासाठी मी प्रयत्न करेन"

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT