Pune Election: "आता त्यांना निर्णय घ्यायचाय, या लढाईत राहायचं की नाही"; ठाकरेंच्या सेनेचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला इशारा?

Pune Election: राज्यात सध्या महापालिका निवडणुकींची रणधुमाळी सुरु झाली आहे. युत्या आघाड्यांची सरमिसळही सुरु आहे. कोण कोणाशी हातमिळवणी करेल काही सांगता येत नाही. याचपार्श्वभूमीवर शह-कटशहाचे आखाडे वापरले जात आहे.
Sharad Pawar-Uddhav Thackeray
Sharad Pawar-Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Pune Election: राज्यात सध्या महापालिका निवडणुकींची रणधुमाळी सुरु झाली आहे. युत्या आघाड्यांची सरमिसळही सुरु आहे. कोण कोणाशी हातमिळवणी करेल काही सांगता येत नाही. याचपार्श्वभूमीवर शह-कटशहाचे आखाडे वापरले जात आहे. पुणे महापालिकेसाठी पण महायुतीतले घटक पक्ष महाविकास आघाडीच्या घटक पक्षांसोबत त्याचप्रमाणं उलटही चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच इथं शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती जवळपास निश्चित झाल्याची चर्चा सुरु आहे. त्यामुळं मविआतील काँग्रेस-शिवसेना यांनीही आघाडीसाठी पर्याय निवडायला सुरुवात केली आहे.

दरम्यान, शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं आता त्यांना निर्णय घ्यायचा आहे की या लढाईत रहायचं की नाही, अशा शब्दांत ठाकरेंचे विधानपरिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी एकप्रकारे इशाराच दिला आहे.

Sharad Pawar-Uddhav Thackeray
Gen Z : 'जेन झी अन् जेन अल्फा' विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करतील! PM मोदींचं मोठं विधान; म्हणाले, पूर्वी स्वप्न पाहाणं...

भाजपसोबत असलेल्या अजित पवारांच्या पक्षाशी युतीला विरोध करताना शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी नुकताच पक्षाला रामराम केला. त्यांना शिवसेनेत घेण्यासाठी उद्धव ठाकरेंनी थेट फोनही केला. पण जगताप यांनी काँग्रेसमध्ये जाणं पसंत केलं. यावर प्रतिक्रिया देताना सचिन अहिर म्हणाले, आम्हाला आनंद आहे की ते महाविकास आघाडीच्या घटक पक्षासोबतच आहेत.

आमच्या विचारधारेसोबत ते राहिले हा आनंद आहे, ते राष्ट्रवादीत राहिले असते तर जास्त आनंद झाला असता. पुण्यात शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत जाते की नाही याबाबत अजूनही संभ्रम आहे. त्यामुळं पुण्यात मनसे आणि महाविकास आघाडी असा विचार सुरू आहे. पण उद्या संध्याकाळपर्यंत पुण्यातल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्याचा शिवसेनेचा मानस आहे, असंही अहिर यांनी स्पष्ट केलं.

Sharad Pawar-Uddhav Thackeray
Sambhaji Nagar News: महायुतीचा 'रात्रीस खेळ चाले'! भाजप अध्यक्षांच्या घरी रात्री उशीरापर्यंत बैठक, पण...

दरम्यान, जयंत पाटील यांच्यासोबतच्या चर्चेमध्ये आम्ही नव्हतो आम्ही वेगळ्या कामासाठी आलो होतो, असं सांगताना अहिर म्हणाले, आमच्या बैठकीत आताची भौगोलिक परिस्थिती पाहता त्या परिसरात आपला उमेदवार कसा निवडून आणता येईल असा निर्धार करण्यात आला. सकारात्मक बैठक झाली, अंतिम निर्णय शरद पवार, उद्धव ठाकरे हे घेतील. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटांसोबत सकारात्मक चर्चा झाली आहे.

आता त्यांना निर्णय घ्यायचा आहे की या लढाईत राहायचे की नाही. आमच्याकडे आलेल्या राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळात जयंत पाटील, मुंबई अध्यक्ष होते या शिष्टमंडळातील बाकीचे लोक कुठे गेले हे माहित नाही. ही लढाई सत्तेसाठी नाही तर मुंबई वाचविण्यासाठी असून यासाठी ते येणार असतील तर ठीक आहे, असंही यावेळी सचिन अहिर यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com