Advocate Asim Sarode addresses the media after Prashant Koratkar’s bail Sarkarnama
पुणे

Asim Sarode statement : कोरटकरला जामीन मंजूर अन् असीम सरोदेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...

Advocate Asim Sarode’s Statement on Police Actions : ...तर जामीन रद्द करण्यासाठी आम्ही कोर्टात जाऊ, असं देखील असीम सरोदे म्हणाले.

Sudesh Mitkar

Prashant Koratkar bail News : महापुरुषांचा अवमान करणे, समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणे तसेच इतिहासकार इंद्रजीत सावंतांना फोन करून धमकावणे या प्रकरणांतील आरोपी प्रशांत कोरटकर याने आज कोल्हापूर सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. यावर सुनावणी पार पडली आणि कोरटकरला कोर्टाने जामीन मंजूर केला. यानंतर सुनावणीवेळी काय-काय घडलं याबाबतची माहिती इंद्रजीत सावंत यांचे वकील असीम सरोदे यांनी माध्यमांना दिली आहे.

असीम सरोदे(Asim Sarode) म्हणाले, न्यायालयाने कुठल्या कलमाखाली गुन्हे नोंद केला गेला आहे आणि शिक्षा किती आहे, हा विचार करून जामीन दिला गेला असावा असं प्रथम दर्शनी वाटतं आहे. तरी देखील आम्ही तीन वर्ष शिक्षा असलेल्या गुन्ह्यांमध्ये कोरटकरला इतके दिवस जामीन मिळू दिला नव्हता.

महापुरुषांबाबत अवमानकारक वक्तव्य करत कोरटकरने नसलेला ब्राह्मण मराठा वाद पेटवायचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या प्रकरणांमध्ये कोरटकरला लगेच जामीन व्हायला नको होता, असं आम्हाला वाटत आहे. आरोपीला अटक केल्यानंतर ६० दिवसांत तपास व्हावा असं बंधन पोलिसांवर असतं मात्र आता जामीन झाला असल्याने ते साठ दिवसांचं बंधन पोलिसांवर असणार नाही. त्यामुळे या प्रकरणाचा तपास रेंगाळण्याची शक्यता नाकरता येत नाही. असंही सरोदे म्हणाले.

न्यायालयाने कुठल्या आधारे कोरटकरला जमीन दिला आहे, हे पाहावं लागेल. ज्या अटी व शर्थींवर जामीन दिला ते पाहावं लागेल. जर कोरटकर याने त्याचे उल्लंघन केले अटी व शर्थी पाळल्या नाहीत तर जामीन रद्द करण्यासाठी आम्ही कोर्टात जाऊ असं देखील असीम सरोदे म्हणाले.

जामीन होऊ नये अशी मागणी पोलिसांनी केली होती. तपास अजून पूर्ण झाला नाही असं सांगितलं होतं. मात्र जामीन झाला असून आता कोरटकरला कोणत्या अटी आणि शर्थी घातल्या गेल्या आहेत, त्या ऑर्डर आल्यावर कळतील. कोरटकर हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा व्यक्ती आहे. त्यामुळे ओळखी वापरून तो काहीही करू शकतो. पोलिसांची सुरक्षा असताना तो फरार झाला आहे. मोबाईल जमा करताना पुरावा नष्ट केला होता. या सगळ्या गोष्टी विचारत घेता जामीन होणे अपेक्षित नव्हते असं असीम सरोदे म्हणाले.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT