Utpal Parrikar : मनोहर पर्रीकरांचे पुत्र भाजपच्या वाटेवर? ; म्हणाले ''तिकीट कापले म्हणून पक्ष...''

Utpal Parrikar’s Likely Return to BJP : ''पोटनिवडणुकीसाठी मला तिकीट नाकारण्यात आले याचे कारण...'' असा मोठा गौप्यस्फोटही उत्पल पर्रीकर यांनी मुलाखतीत बोलताना केला आहे.
Utpal Parrikar, son of late Manohar Parrikar, is likely to join BJP, sparking discussions about his political comeback in Goa.
Utpal Parrikar, son of late Manohar Parrikar, is likely to join BJP, sparking discussions about his political comeback in Goa. Sarkarnama
Published on
Updated on

BJP Goa : गोव्याच्या राजकारणामधून एक मोठी बातमी समोर येत आहे. कारण, माजी मुख्यमंत्री आणि देशाचे माजी संरक्षण मंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र, उत्पल पर्रीकर खरंच भाजपमध्ये प्रवेश करणार का? याबाबत त्यांनी स्वत:च भाष्य केले आहे.

तसेच, ''नवे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी अपेक्षेप्रमाणे काम केल्यास त्यांचे आणि माझे विचार व मते जुळतील.'', असे उत्पल पर्रीकर म्हणाले आहेत. तसेच तिकीट कापले म्हणून पक्ष सोडला नव्हता, असेही उत्पल पर्रीकर यांनी एका मुलाखतीत बोलताना स्पष्ट केले आहे.

उत्पल पर्रीकर यांनी एका खासगी युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत भाजप प्रवेशाबाबत देखील भूमिका स्पष्ट केली. 'नव्याने नियुक्त प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्यासोबत पहिल्यापासूनच उत्तम संबंध आहेत. हे संबंध राजकारणापलिकडचे आहेत. त्यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर मी त्यांच्याकडे केव्हाही जाऊन बोलू शकतो, माझे मत व्यक्त करु शकतो. पण, सध्या भाजपमध्ये प्रवेश करण्याची कोणत्याही चर्चा सुरु नाही', असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Utpal Parrikar, son of late Manohar Parrikar, is likely to join BJP, sparking discussions about his political comeback in Goa.
Rahul Gandhi latest news : ''भाजप अन् 'RSS'ला फक्त काँग्रेसच रोखू शकते बाकी पक्ष नाही, कारण...'' ; राहुल गांधींचं मोठं विधान!

याशिवाय, 'मनोहर पर्रीकर यांच्या मृत्यूनंतर झालेल्या पोटनिवडणुकीसाठी मला तिकीट नाकारण्यात आले याचे कारण माझे बाबा आणि माझ्यावर काही नेत्यांचा राग होता, असा खुलासा उत्पल यांनी या मुलाखतीत केला. नव्या प्रदेशाध्यक्षांनी अपेक्षेनुसार काम केल्यास आमची मते जुळतील.' असेही उत्पल म्हणाले. तर तिकीट नाकारल्यामुळे मी पक्ष सोडला नाही. त्यावेळी ८० टक्के केडर माझ्यासोबत होते, असे मला एका वरिष्ठ नेत्यांने मला सांगितले होते', असेही उत्पल पर्रीकर यांनी मुलाखतीत सांगितले.

Utpal Parrikar, son of late Manohar Parrikar, is likely to join BJP, sparking discussions about his political comeback in Goa.
Rahul Gandhi on BJP : ''महाराष्ट्राच्या लोकांना विचारा, ते सांगतील भाजपने निवडणूक..'' ; राहुल गांधींनी साधला निशाणा!

तसेच, पणजीचे आमदार आणि कामगार व महसूल मंत्री बाबुश मोन्सेरात यांचे राजकारण मला आवडत नाही, असे उत्पल यांनी सांगितले. स्मार्ट सिटीचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे मी यापूर्वीच बोललो होतो. राज्य सरकारसह पणजीचा लोकप्रतिनिधी म्हणून बाबुश देखील याला जबाबदार असल्याचे मत उत्पल यांनी यावेळी व्यक्त केले. स्मार्ट सिटी पणजीचे काम व्यवस्थित पार पाडण्यासाठी सरकारने यात काळजीपूर्वक लक्ष घालण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, पणजी पालिकेतही नेतृत्वात बदल व्हायला हवा, असे मत उत्पल पर्रीकर यांनी यावेळी व्यक्त केले.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com