Prithviraj Chavan Sarkarnama
पुणे

Prithviraj Chavan : नेते, अभिनेते आणि उद्योगपतींशी पंतप्रधान मोदींनी तोडपाणी केलं; पृथ्वीराज चव्हाणांचं वर्मावर बोट

Sudesh Mitkar

Pune Political News : भाजप सरकारने शंभर दिवसांत परदेशातला काळा पैसा आणतो म्हटले होते. मात्र भारताबाहेर एक अब्ज डॉलर रुपये एवढा काळा पैसा आहे. याबाबतचे पुरावे असूनही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी Narendra Modi कोणावरही कारवाई केली नाही. याबाबत मोदी सरकारने संबंधित नेते, अभिनेते आणि उद्योगपती यांच्याशी तोडपाणी केली आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी यांनी केला आहे.

काळ्या पैशांबाबतचे सर्व पुराव्या असतानाही मोदींनी याबाबत कारवाई का केली नाही? याचे उत्तर त्यांना नागरिकांना द्यावा लागेल, असे आव्हानही त्यांनी सरकारला केले आहे. तसेच इंडिया आघाडीचे सरकार आल्यानंतर हे सर्व कागदपत्र बाहेर काढून प्रत्येकावर कारवाई करणार असल्याचा शब्दही त्यांनी दिला.

पुणे लोकसभेचे उमेदवार रवींद्र धंगेकर Ravindra Dhangekar यांच्या प्रचारार्थ रविवारी (ता. २१) माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी चव्हाण म्हणाले, मोदी सरकारने तरुणांना रोजगार निर्माण करणार असल्याचे खोटे आश्वासन दिले. मात्र देशात रोजगार निर्मिती झालेली नाही. प्रचंड प्रमाणात बेरोजगार असून तरुण हाताश झाले आहेत. मोदी सरकारने शेती मधले उत्पन्न डबल करण्याचा आश्वासन दिले होते. ते पूर्ण न करता शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये विष घालवण्याचे काम केले. मोदी सरकारने शेती संदर्भात तीन काळे कायदे आणले. त्याविरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन केले आणि सरकारला माघार घ्यावी लागली. याचा सूड कुठेतरी सरकार शेतकऱ्यांवर उगवत असल्याची टीका पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan यांनी केली.

मोदी सरकारने गेल्या दहा वर्षांमध्ये अनेक आश्वासने दिली, मात्र त्या आश्वासनांचा सरकारला विसर पडला आहे. त्यामुळे या निवडणुकांमध्ये मोदींनी त्यांनी दिलेले आश्वासनाचा काय झाले याबाबतचा अहवाल लोकांपुढे सादर करायला हवा. मागे दिलेली आश्वासने पूर्ण झाली नाही. मग आता दिलेली आश्वासने कशी पूर्ण होणार? असा सवालही चव्हाणांनी उपस्थित केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मोदींच्या काळात अर्थव्यवस्थेचा विकास मंदावलेला आहे. ते मान्य करत नाहीत. देशाचे अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर गेली आहे. हे सांगून पाठ थोपटून घेतात. मात्र मनमोहन सिंग Manmohan Singh यांच्या काळामध्ये जो विकासदर होता तो विकासदर मोदी सरकारच्या काळात राहिला असता तर आता देशाची अर्थव्यवस्था पाचव्या नव्हे तर तिसऱ्या स्थानावर पोचली असती, याकडेही चव्हाणांनी लक्ष वेधले. मोदी सरकारने इलेक्ट्रॉन बॉण्डच्या माध्यमातून मोठा कॅशलेस भ्रष्टाचार केला असल्याचा आरोपही चव्हाणांनी केला.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT