Lok Sabha Election 2024 : उमेदवार अजितदादांचा अन् निवडून आणण्यासाठी शर्यत लागली फडणवीसांच्या आमदारांमध्ये

Dharashiv Lok Sabha Election 2024 : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दोन विश्वासू आमदारांमध्ये अर्चना पाटलांना लीड देण्यासाठी पैज लागली आहे.
rajendra raut ajit pawar ajit pawar devendra fadnavis abhimanyu pawar
rajendra raut ajit pawar ajit pawar devendra fadnavis abhimanyu pawarsarkarnama

धाराशिव मतदारसंघ ( Dharashiv Lok Sabha Constituency ) शिवसेनेचा बालेकिल्ला. भाजप आणि शिवसेनेत धाराशिव मतदारसंघावरून रस्सीखेच सुरू होती. पण, उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांच्या राष्ट्रवादीला ही जागा मिळाली. राष्ट्रवादीकडून भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील ( Archana Patil ) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर ( Omprakashraje Nimbalkar ) आणि अर्चना पाटील यांच्यात थेट लढत होणार आहेत.

यातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांच्या दोन विश्वासू आमदारांमध्ये अर्चना पाटलांना लीड देण्यासाठी पैज लागली आहे. बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत ( Rajendra Raut ) आणि औशाचे आमदार अभिमन्यू पवार ( Abhimanyu Pawar ) यांनी अर्चना पाटलांना निवडून आणण्यासाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

एका मेळाव्यात बोलताना अभिमन्यू पवार म्हणाले, "सभेतील गर्दी पाहून विरोधकांमध्ये धडकी भरली असेल. समोरच्यांनी ( ओमप्रकारचे निंबाळकर ) डिपॉझिट वाचवण्याची तयारी करावी. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी सर्वजण अतूर आहेत. नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी 399 जागांचा हिशोब केला आहे. 400 वा आकडा धाराशिवच्या जागेचा आहे. 3 लाखांहून अधिक मतांनी अर्चना पाटलांना निवडून देणार आहोत."

rajendra raut ajit pawar ajit pawar devendra fadnavis abhimanyu pawar
Devendra Fadnavis News : "पंतप्रधान व्हावं, असं फडणवीसांचं स्वप्न होतं, पण मोदी अन् शहांनी त्यांचे पंख छाटले"

"अर्चना पाटलांना औसेकर की बार्शीकर जास्त लीड देणार? यासाठी माझी आणि राजाभाऊ राऊतमध्ये शर्यत लागली आहे. उमरगा, बार्शी, औसा, धारशिव, तुळजापूर, भूम, परंडा येथील सहा विधानसभेतून अर्चना पाटलांना तीन लाखांच्या पुढं लीड देत मोदींचं हात बळकट करायचे आहेत," असं आवाहन अभिमन्यू पवारांनी केलं.

rajendra raut ajit pawar ajit pawar devendra fadnavis abhimanyu pawar
Uddhav Thackeray News : 'जय भवानी' शब्दावर आक्षेप घेणाऱ्या आयोगाच्या नोटीसीला ठाकरेंकडून केराची टोपली

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com