Prithviraj Chavan Sarkarnama
पुणे

Prithviraj Chavan : मोदींनी जगातील सर्वात मोठा घोटाळा केला; पृथ्वीराज चव्हाणांचा घणाघात

Sudesh Mitkar

Maharashtra Congress : ईडी‌ सीबीआयच्या धाडी‌ टाकून मोदी सरकारने मोठ्या कंपन्या व व्यक्तींना भीती दाखवत निवडणूक रोख्याच्या नावाखाली पैसा गोळा केला. त्यांनी निवडणूक रोख्याच्या माध्यमातून जगातील सर्वात मोठा घोटाळा केल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे प्रदेश प्रचारप्रमुख पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. देशात इंडिया आघाडीचे‌ सरकार आल्यावर‌ आम्ही निवडणूक रोखे प्रकरणाचा तपास करू, असेही त्यांनी आश्वासन दिले.

पुणे लोकसभेचे महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर Ravindra Dhangekar यांच्या प्रचारार्थ काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत चव्हाण बोलत होते. ते म्हणाले, आज देशावर २०६ लाख कोटी‌ कर्ज आहे. लोकांना चुकीची माहिती देवून भुरळ टाकण्याचे काम मोदी करत आहेत. मोदी सरकारने दहा वर्षात काय केले याची‌ श्वेतपत्रिका काढावी, म्हणजे २०१४ पूर्वी आणि नंतर काय झाले याची‌ तुलना करता येईल.

दरवर्षी दोन कोटी लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. दहा वर्षात २० कोटी लोकांना रोजगार मिळायला हवा होता, मात्र काहीच झाले नाही. उलट देशात बेरोजगारी वाढली. डिझेल पेट्रोलचा‌ भाव ३५ रुपये करण्याचे आश्वासन दिले होते. तसेच शंभर शहरे‌ स्मार्ट सिटी करण्याचा दावा केला होता. या सर्व आश्वासनांचे काय झाले, याचा अहवाल मोदींनी तयार करावा, असेही चव्हाणांनी Prithviraj Chavan आवाहन केले.

२०१९ मध्ये‌ सत्तर टक्के लोकांनी मोदी विरोधी मते दिली. मात्र मत विभाजनामुळे मोदी सत्तेवर आले. त्यामुळे आम्ही इंडिया आघाडी उभे केली आहे. भाजपला राज्य घटना बदलायची आहे, त्यासाठी त्यांचे नेते ४०० पार म्हणत आहेत. मात्र, देशात मोदी विरोधी वातावरण आहे. पंतप्रधानांचा दांभिकपणा व खोटारडेपणा जनतेसमोर आलेला आहे. त्यामुळे निवडणुकीचा‌ निकाल लागल्यानंतर भाजप २०० पारही करू शकले नाही, हे कळेल.

मत विभाजनासाठी भाजपकडून वंचित Vanchit व एमआयएमचे उमेदवार निवडणुकीत उतरवले जात आहेत. मागच्या वेळी वंचित व एमआयएमची आघाडी होती. या निवडणुकीत ती नाही. आता संविधान बचावण्यासाठी मोदींचा पराभव गरजेचे आहे. ही निवडणूक संविधान व देश वाचवणारी आहे. त्यामुळे वंचित व एमआयएमच्या उमेदवारांना जनता मते देणार नाहीत, असा विश्वासही चव्हाणांनी व्यक्त केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शेतकरी, युवक, महिला, कामगार व सामाजिक न्याय यावर आधारीत काँग्रेसचा जाहीरनामा आहे. शेतकऱ्याच्या कर्जमाफीवर स्वतंत्र आयोग असेल. आम्ही कर्नाटकातील पाचही आश्वासने पूर्ण केली आहेत. लोकसभेसाठी‌ दिलेली देखील सर्व आश्वासने आम्ही पूर्ण करू, असा दावा चव्हाणांनी केला. महाराष्ट्रात राजकीय परिस्थिती अस्थिर आहे. राज्यात आर्थिक व नैतिक भ्रष्टाचार आहे. फोडाफोडीचा लोकांना राग आलेला आहे. आमदार तिकडे गेलेले असले तरी जनता गेलेली नाही. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीला प्रचंड मोठा विजय मिळेल, असा विश्वासही चव्हाणांनी व्यक्त केला.

यावेळी माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात Balasaheb Thorat, काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष व लोकसभा निवडणूक प्रचारप्रमुख मोहन जोशी, माजी राज्यमंत्री रमेश बागवे, माजी आमदार दिप्ती चवधरी, ॲड अभय छाजेड, कमल व्यवहारे, संजय बालगुडे, वीरेंद्र किराड,गोपाल तिवारी आदी उपस्थित होते.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT