Sushma Andhare questions Project X party attendees Sarkarnama
पुणे

Project X Party Pune: 'प्रोजेक्ट एक्स' पार्टीत आमदार-खासदारांची मुलं होती?; सुषमा अंधारेंचा गंभीर सवाल

Political reaction to Project X party raid: पुण्यातील 'प्रोजेक्ट एक्स' पार्टी प्रकरणावर सुषमा अंधारे यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. 156 जणांपैकी फक्त 78 जणांवरच कारवाई का झाली, काही राजकीय नेते, खासदार, आमदार किंवा उद्योगपतींची मुलं यात होती का, असा सवाल त्यांनी केला.

Sudesh Mitkar

Pune rave party controversy 2026: प्रोजेक्ट एक्स' या नावाने आयोजित केलेल्या पार्टीवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने शनिवारी रात्री लोणीकंद हद्दीत धडक कारवाई केली. आळंदी-मरकळ रस्त्यावरील या रिसॉर्टवर सुरू असलेल्या अनधिकृत रेव्ह पार्टीवर १५ अधिकारी आणि ६५ हवालदारांच्या पथकाने छापा टाकला गेला.

या पार्टीमध्ये 156 लोक सापडले त्यातील 78 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचे समोर आले आहे. तर फक्त 29 जणांची टेस्ट करण्यात आली. इतर लोकांवर कोणतीही कारवाई अथवा त्यांच्या टेस्ट न करता सोडून दिलाचा दावा करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी यापार्टीमध्ये आमदार, खासदार आणि उद्योगपतींची मुलं होती का? असा सवाल केला आहे.

याबाबत प्रतिक्रिया देताना सुषमा अंधारे म्हणाल्या, "पुण्याच्या तुळापूर जवळ एका पार्टीमध्ये १५६ लोक सापडलेत. पण १५६ लोकांपैकी फक्त ७८ लोकांवर गुन्हे दाखल झाले, तर त्यापैकी फक्त २९ लोकांची टेस्ट केली गेली अन्य जणांना खुले का सोडण्यात आलं? असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे.

जर पार्टीमध्ये १५६ लोक होते तर सर्वांवर गुन्हे का दाखल झाले नाहीत? गुन्हे फक्त आणि फक्त ७८ लोकांवरच का? आणि ७८ लोकांवर गुन्हे दाखल करूनही त्यातल्या फक्त २९ लोकांची टेस्ट का केली गेली? असा सवाल करत सुषमा अंधारे यांनी १५६ मधील काही मुले ही आमदार, खासदारांची, कुठल्या बड्या राजकीय नेत्यांची, उद्योगपतींची होती का ? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

तो कागद कुठे आहे?

आयटी क्षेत्रांतली लोकं ज्यांचा काही कोटीच्या घरात पगार आहे आणि जे जिथल्या तिथे प्रकरण मॅनेज करू शकतात, अशा मुलांना तर सोडून देण्यात आलं नाही ना? कारण पोलीस असं सांगतात की या प्रकरणामध्ये एक्साईज डिपार्टमेंटची परमिशन घेतली गेली होती. पण मग एक्साईज डिपार्टमेंटची परमिशन घेतली तर तो कागद कुठे आहे? तो कागद पब्लिक झाला पाहिजे, अशी मागणी देखील सुषमा अंधारे यांनी केली.

गृहखातं जबाबदारी घेणार का?

तुळापूर हे छत्रपती संभाजी महाराजांच्या जिथं पवित्र स्मृती आहेत, अशा ठिकाणी इतकी भयंकर घटना घडते आणि पोलीस याला इतक्या कॅज्युअली घेतात हेच प्रचंड आश्चर्यकारक आहे. गृहखातं कधीतरी जबाबदारी घ्यायला शिकेल का? अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT